ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र व ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल ही अभिनय कारकिर्दीपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच अधिक चर्चेत राहिली आहे. गेले काही दिवस त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. त्यामुळे दोघांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अशातच नुकताच ईशा देओलने पती भरत तख्तानीबरोबर घटस्फोट घेतला. दोघांनी त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं अधिकृतपणे सांगितलं आहे.
या दोघांच्या नात्यात दुरावा येण्याचे कारण हे भरतचे विवाहबाह्य संबंध असल्याचे म्हटले जात आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, गेले काही दिवस भरत-ईशा ही दोघेही एकत्र कोणत्याच पार्टीत दिसले नाहीत. तसेच एकमेकांबरोबचे फोटोही त्यांनी शेअर केलेले नाहीत. ईशाचा पती भरत याचे विवाहबाह्य संबंध असून त्याची गर्लफ्रेंड बंगळूरमध्ये राहणारी असल्याचेही म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वी एका नेटकऱ्याने Reddit वर नवीन वर्षाच्या दिवशी बंगळुरूमध्ये एका पार्टीत ईशाचा पती भरतला त्याच्या एका मैत्रिणीबरोबर पाहिले असल्याचा दावा केला होता. त्यामुळे भरतची मैत्रीण ही बंगळुरूमध्येच राहत असल्याचे सांगण्यात आले होते आणि तिच्यामुळेच भरत-ईशा यांच्यात दुरावा आला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अर्थात यावर अद्याप भरत किंवा ईशा यांच्याकडून कुठेही अधिकृतपणे भाष्य करण्यात आलेले नाही.
ईशा-भरत यांनी काल त्यांच्या लग्नाच्या १२ वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. “आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनातील या बदलामुळे आमच्या दोन मुलांचे हित आणि कल्याण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि यापुढेही ते कायम राहील. यादरम्यान आमच्या गोपनीयतेचा आदर केला जाईल अशी आशा बाळगतो.” असं म्हणत ते एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.
दरम्यान, ईशा व भरत यांची पहिली भेट कॅस्केड आंतरशालेय स्पर्धेत झाली. इथेच दोघांची मैत्री झाली आणि मग ते एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी २०१२ साली लग्न केले. पण आता ही दोघे वेगळे झाले आहेत.