शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हात मिळवल्यानंतर त्याने…”, अंकिता लोखंडेला बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्याकडून घाणेरडी वागणूक, मोठा खुलासा करत म्हणाली, “त्याच्याकडून थोडं…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 7, 2024 | 9:59 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bigg Boss 17 fame Ankita Lokhande talked about her casting couch experience see the details

"हात मिळवल्यानंतर त्याने…", अंकिता लोखंडेला बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्याकडून घाणेरडी वागणूक, मोठा खुलासा करत म्हणाली, "त्याच्याकडून थोडं…"

मनोरंजन सृष्टीत काम करताना प्रत्येकालाच काहीना काही अडचणींना सामोरे जावे लागते. त्यात स्त्रियांच्या वाटेला या इंडस्ट्रीत थोडा अधिकच संघर्ष असतो. त्यातही कुणाचा पाठिंबा नसेल किंवा या इंडस्ट्रीत कुणी गॉडफादर नसेल तर अनेकदा खूप कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले असल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या किंवा वाचल्या असतीलच. सिनेसृष्टी आणि कास्टिंग काऊच या गोष्टी अनेकदा कानावर पडत असतात. कलाकारांनी याबाबतीतले आपले भयंकर अनुभव प्रेक्षकांबरोबर अनेकदा शेअर केले आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडेलाही कास्टिंग काऊच या प्रकारातून एकदा नव्हे तर दोनदा जावे लागले होते.

पवित्र रिश्ता मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. मालिका विश्वातून अभिनेत्रीला खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी व लोकप्रियता मिळाली. अशातच अंकिताने नुकत्याच पार पडलेल्या बिग बॉस च्या १७व्या पर्वातदेखील पतीबरोबर सहभाग घेतला होता. यामुळे तर तिच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली. दरम्यान अभिनेत्रीने तिच्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितले.

आणखी वाचा – लग्नाच्या १२ वर्षांनंतर हेमा मालिनीच्या लेकीचा घटस्फोट, दोन मुलंही आहेत आणि…; नवऱ्यापासून वेगळं होताच म्हणाली, “आमच्या आयुष्यातील…”

कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल अभिनेत्री म्हणाली, “मी खूप हुशार होते आणि त्या खोलीत एकटीच होते. त्यावेळी मी १९ किंवा २० वर्षांची असावी. मी निर्मात्याला विचारले “तुम्हाला कोणत्या प्रकारचे करार हवे आहेत? मला पार्टी किंवा रात्री डिनरला वगैरे जावे लागेल का?” मला अशी परिस्थिती टाळायची आहे जिथे मला थेट निर्मात्याबरोबर वाईट कृत्य करायला सांगितले जाईल. पण नेमके तसेच झाले आणि त्याने हे सांगताच मी त्यांना “तुम्हा लोकांना मुलगी ही कामासाठी नव्हे, तर चुकीच्या गोष्टींसाठी हवी आहे.” एवढ म्हणून तिथून निघून गेली. मग त्याने माफी मागितली आणि सांगितले की, “तो मला त्याच्या चित्रपटात घेणार आहे”. परंतु मी त्याला स्पष्टपणे सांगितले की “तुम्ही मला चित्रपटात घेण्याचा प्रयत्न केला तरी मला आता तुमच्या चित्रपटात काम करण्यात काहीही रस नाही”.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

आणखी वाचा – हृतिक रोशन-दीपिका पदुकोणच्या किसिंग सीनमुळे वायुसेना दल नाराज, ‘फायटर’ वादात, अधिकृत नोटीसही पाठवली अन्…

यानंतर दुसऱ्या घटनेबद्दल बोलताना अंकिता म्हणाली, “मालिका केल्यानंतर मी जेव्हा चित्रपटांमध्ये परतले. तेव्हा मला हा अनुभव पुन्हा आला. मी फक्त त्या व्यक्तीशी हात मिळवला. मला आता त्याचे नाव घ्यायचे नाही, तो आता एक मोठा अभिनेता आहे. मी त्याच्याबरोबर जेव्हा हात मिळवला. तेव्हा मला त्याच्याकडून थोडं विचित्र जाणवले. म्हणून मग मी त्याच्यापासून माझा हात पटकन काढून घेतला. मला समजून चुकलेले की इथे देण्याघेण्याचा विषय सुरु आहे. त्यामुळे मी तिथून निघून गेली”.

Tags: ankita lokhandebigg bossBigg Boss 17 Famebollywood actressbollywood newsentertainment newsअंकिता लोखंडेबिग बॉसबिग बॉस १७ फेमबॉलिवूड अभिनेत्रीबॉलीवूड बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Actress Prajakta Mali mother went to Singapore with the Maharashtrachi hasyajtra team video shared on instagram

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमसह सिंगापूरमध्ये पोहोचली प्राजक्ता माळीची आई, माय-लेकींची धमाल मस्ती अन्...; अभिनेत्रीने शेअर केला सुंदर व्हिडीओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.