मंगळवार, मे 20, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर मनसेमध्ये प्रवेश करणार?, म्हणाली, “राज ठाकरेंच्या घरी गेले तेव्हा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 1, 2023 | 6:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ankita walavalkar on raj Thackeray

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर मनसेमध्ये प्रवेश करणार?, म्हणाली, “राज ठाकरेंच्या घरी गेले तेव्हा...”

सध्या सोशल मीडियावर रिल स्टारची अधिकाधिक चलती असल्याचं चित्र पाहायला मिळतं. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर म्हणून काही चेहरे चर्चेत आले. त्यातीलच एक चेहरा म्हणजे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर. अंकिता सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक लोकांशी संपर्क साधते. शिवाय तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. अशामध्येच अंकिता राजकीय क्षेत्रात प्रवेश करणार का? अशा बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. आता तिने यावर उत्तर दिलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताला “राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करणार का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अंकिताने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं. ती म्हणाली, “पहिल्यापासून राजकारणातलं व्यक्तीमत्त्व म्हणून बाळासाहेब ठाकरे मला खूप आवडायचे. त्यांची परखड बोलण्याची शैली मला आवडत होती. त्यानंतर राज ठाकरे हे व्यक्तीमत्त्व मला आवडू लागलं”.

आणखा वाचा – Video : घरातील सत्यनारायणाच्या पूजेदिवशी ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा गॉगल घालून जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणतात, “म्हातारे झाले तरीही…”

“त्यामुळे त्यांच्याकडे माझा अधिक कल आहे असं मी म्हणणार नाही. पण कोण चांगलं किंवा कोण वाईट काम करत आहे हे आपल्याला कळतं. म्हणून त्या पक्षाबरोबर (मनसे) माझा अधिक संबंध आला. त्यानंतर इन्फ्युएन्सर म्हणून मी राज ठाकरे यांच्या घरीही गेले होते”. अंकिताने राज ठाकरे यांची भेट घेत मनसेच्या कार्यक्रमात उपस्थितीही दर्शवली होती.

आणखी वाचा – Video : डोळ्यात पाणी, भावुक अन्…; सई ताम्हणकरने खरेदी केलं नवीन घर, जुन्या घराचा निरोप घेताना म्हणाली, “मला खरंच…”

View this post on Instagram

A post shared by Ankita Pramod Walawalkar (@kokanheartedgirl)

पुढे ती म्हणाली, “पक्षामध्ये प्रवेश करण्याचा माझा आता काही विचार नाही. पण माझ्यामुळे कोणाचं काही भलं होत असेल आणि हिच योग्य संधी आहे असं मला वाटलं तर मी तिथे उपस्थित असते. त्यादरम्यान मी पक्ष वगैरे काही बघत नाही. व्यक्ती व प्रसंग बघून नंतरच मी निर्णय घेते”. आता खरंच अंकिता मनसेचा चेहरा बनणार का? हे पाहावं लागेल.

Tags: entertainment newsmarathi actresssocial media influencers
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
atisha naik on her first period

“पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यानंतर बाबांजवळ गेले अन्…”, अतिशा नाईकने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “त्यांनी मला कधीही…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.