पन्नाशी ओलांडलेल्या अन एव्हरग्रीन जोडीच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जात ते नावं म्हणजे नारकर कपल. अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मन जिंकली आहेत. कलाकार म्हणून ही जोडी गेला अनेक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. कामाव्यतिरिक्त ही जोडी त्यांच्या सोशल मीडियावरील वावर पाहता विशेष चर्चेत असते. त्यांचे ट्रेंडिंग गाण्यावरचे रिल्स नेहमीच ते दोघे सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे हे व्हिडीओ कायमच चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. आजही त्यांचा तो उत्साह काळानुसार पुढे जाण्याची वृत्ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते. (Avinash and Aishwarya Narkar New Reel)
सोशल मीडियावर या जोडीचा प्रत्येक व्हिडीओ व्हायरल होत असतो. नुकताच त्यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे; जो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. बरं या व्हिडिओमध्ये या जोडप्याने ठेका धरलेला पाहायला मिळतोय. इतकंच नव्हे तर अविनाश व ऐश्वर्या नारकर यांच्या घरी पूजा ठेवण्यात आलेली असते, त्यावेळी ते पूजेसाठी तयार झालेले असतात. त्यांच्या या पारंपारिक वेशात या जोडीने ठेका धरलेला पाहून प्रेक्षकांना त्यांचा हा डान्स अधिक आवडला आहे.
‘केसात गजरा, नाकात नथ, जरीची साडी’ घालून ऐश्वर्या यांचा मराठमोळा लूक साऱ्यांनाच भुरळ घालतोय. तर अविनाश यांनी धोतर परिधान केलेलं पाहायला मिळतंय. या मराठमोळ्या अंदाजात दोघांनी गॉगल लावून बनवलेली रील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. अनेकांनी कमेंट करत ऐश्वर्या व अविनाश यांच्या काळानुसार पुढे जाणाऱ्या वृत्तीच समर्थन केलं आहे.
एका नेटकऱ्याने या जोडीचा नृत्याविष्कार पाहून “सर्व कलाकार आहेत तुमच्या घरात तुमचं आडनाव नारकर नाही तर नृत्यकर असायला पाहिजे होत.” असं म्हटलं आहे. तर आणखी एका युजरने “अविनाश तर म्हातारे झाले मग कसं” अशी मजेशीर कमेंट केली आहे. तर अनेकांनी त्यांच्या या नृत्याचं कौतुक केलं आहे.