रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : डोळ्यात पाणी, भावुक अन्…; सई ताम्हणकरने खरेदी केलं नवीन घर, जुन्या घराचा निरोप घेताना म्हणाली, “मला खरंच…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 1, 2023 | 12:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saie Tamhankar New House

Video : डोळ्यात पाणी, भावुक अन्…; सई ताम्हणकरने खरेदी केलं नवीन घर, जुन्या घराचा निरोप घेताना म्हणाली, "मला खरंच…"

लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकतीच एक खुशखबर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एक मैलाचा दगड पार करत अभिनेत्री सई ताम्हणकरने मुंबई शहरातील तीच पहिलं घर विकत घेतलं आहे. नवीन घर घेतल्याचा आनंद शेअर करत सईने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या जुन्या घरातील सामान नव्या घरात शिफ्ट करताना दिसतेय. हा व्हिडिओ शेअर करत ती असंही म्हणतेय की, “मला खरंच जायचं नाही आहे, मला माहित आहे की ते घर मोठं आहे, छान आहे. पण काही गोष्टी अशा लगेच सुटत नाहीत. ही जागा तशी आहे. या घराने मला खूप दिलंय.” (Saie Tamhankar New House)

या व्हिडिओसोबत तिने कॅप्शन देत म्हटलं आहे की, “‘द एलेव्हन्थ प्लेस’, पुन्हा घाबरून व उत्साहाने, मी नवीन घरात पाऊल ठेवतेय, एक स्वप्न पूर्ण झालंय, माझं पहिलं मुंबईतील घर, एक मैलाचा दगड मी गाठला, घरी बोलावण्याचे ठिकाण, जिथे आठवणी विणल्या जातील. पण आनंदादरम्यान, एक कडू आठवण, एके काळी जे माझं घर होतं त्याचा मी निरोप घेत आहे. परिचित भिंती आणि जुन्या निवासस्थानाचा निरोप घेतेय, ज्या ठिकाणी मी एकेकाळी आरामात राहिले होते ते घर मी सोडतेय.”

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

आणखी वाचा – “यावर कमेंट्समध्ये चर्चा नको”, प्राजक्ता माळीच्या पोस्टवरील कॅप्शनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, म्हणाली, “तुम्हाला तर…”

“प्रत्येक खोली बांधताना आठवणी कुजबुजतात, हास्याचे आणि फुललेल्या क्षणांचे प्रतिध्वनी, भिंतींवर भूतकाळातील कथा आहेत, काळामध्ये कोरलेल्या भावनांची गुंफण आहे. पण यापुढे मी नवीन अध्यायाला सुरुवात करत असताना, विनम्र कृतज्ञतेने माझं मन भरून आलं आहे. आजवरच्या आठवणी व शिकलेल्या धड्यांसाठी, या नवीन घरात, नवीन स्वप्ने विणली जातील.”

आणखी वाचा – “गणेशमंडळांना लाऊडस्पीकरसाठी रात्री १२पर्यंत परवानगी अन् सवाई महोत्सवाला…?”, वैभव मांगलेंचा प्रशासनाला सवाल, नेटकरी म्हणतात, “राजकारण्यांच्या…”

पुढे तिने या जुन्या घराचा निरोप घेत म्हटलं आहे की, “म्हणून मी कृतज्ञ आलिंगन देऊन निरोप घेते. मी माझ्या नवीन घरात पाऊल ठेवतेय, एक प्रकाशाचा किरण.” सईने दिलेल्या या गुडन्यूजवर अभिनेत्री अमृता खानविलकर, क्रांती रेडकर, क्षिती जोग यांसारख्या अनेक कलाकारांनी शुभेच्छा देत कमेंट केल्या आहेत.

Tags: entertainmentsaie tamhankarsaie tamhankar new house
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Jawan Trailer Burj Khalifa Dubai

Jawan Trailer : बुर्ज खलिफावर शाहरुख खानच्या 'जवान'चा ट्रेलर प्रदर्शित, 'ते' दृश्य पाहून चाहत्यांचाही आनंद अनावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.