प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक असा काळ येतो जेव्हा तिच्यात खूप बदल होत असतात. त्या काळानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलतं. ते बदल मानसिक असतात तसेच ते शारिरीकही असतात. या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मासिक पाळी. या टप्प्यात तिला समजून घेणं, समजून सांगणं खूप महत्त्वाचं असतं. हा काळ प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतो. तेव्हा तिच्या आयुष्यात महत्त्वाची व्यक्ती असणं गरजेचं असतं जी त्यावेळी तिचा सार्थी बनेल. असाच एक स्वतःच्या आयुष्यातील त्या परिस्थितीतील सार्थीचा किस्सा अभिनेत्री अतिशा नाईकने सांगितला आहे. तिच्या आयुष्यातील या परिस्थितीतील सार्थी कोण ठरलं हे तिने ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.(atisha naik on her first period)
अतिशा बरीच वर्ष मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. तिने आजपर्यंत विविध भूमिका साकारल्या. अभिनय क्षेत्रात भूमिका साकारत असताना त्यांनी नेहमीच आपले विचार परखडपणे मांडले आहेत. असंच तिने आता स्वतःच्या आयुष्यात घडलेला पहिल्या मासिक पाळीबाबतचा किस्सा सांगितला. ती म्हणाली, “मी सगळ्या गोष्टींसाठी माझ्या बाबांवर पूर्णपणे अवलंबून होते. अगदी कोणतीही गोष्ट सांगयची असली तरीही ती अगोदर जाऊन मी त्यांना सांगायचे. कारण त्यांनी नेहमी मला समजून घेतलं. त्यांनी मला कधीही जज केलं नाही”.
वाचा – काय म्हणाले अतिशाचे बाबा?(atisha naik on her first period)
पुढे ती म्हणाली, “त्यामुळे माझी जेव्हा पहिली मासिक पाळी आली तेव्हा त्याबद्दल मी पहिलं त्यांना सांगितलं. मी त्यावेळी खूप घाबरले होते. मला समजत नव्हतं मी काय करावं? मला कळेना नेमकं काय झालं आहे? काय करायचं मी? त्यावेळी ही गोष्ट मी बाबांना सांगितली. कारण त्यांच्याबरोबरचं नातं खूप घट्ट होतं”. पुढे ती म्हणाल्या, “याबद्दल मला काहीच माहित नव्हतं. याला मासिक पाळी किंवा पिरिएड्स म्हणतात याबद्दलही मला कोणतीही माहिती नव्हती. कारण त्यावेळी आम्हाला याचं शिक्षण दिलं जात नव्हतं. आता हे शिक्षण दिलं जातं ही खूप चांगली गोष्ट आहे”.
आणखी वाचा – “माझ्या मुलीला बघून एकाची लाळ गळत होती अन्…”, अतिशा नाईकचा खुलासा, म्हणाली, “छेड काढली…”
पुढे त्या म्हणाल्या, “मी बाबांना सांगितल्यावर बाबा म्हणाले की, हे असंच होतं. पण मी याबद्दल तुला खूप काही सांगू शकणार नाही. आई तुला सगळं नीट समजावेल. त्यांनी मला हे सांगणं सहाजिकच होतं. पण जो नात्यात विश्वास गरजेचा असतो तो विश्वास आमच्यात होता. हा विश्वास सगळ्या नात्यात असणं गरजेचं आहे. मग ते नातं आई-वडिलांबरोबरचं, मित्र-मैत्रिणीबरोबर, भाऊ—बहिणीबरोबर असो अगदी शेजाऱ्यांबरोबरसुद्धा एक नातं असतं ते विश्वासाचं नातं असणं महत्त्वाचं आहे”. अतिशाच्या बोलण्यामधून तिचं वडिलांवर किती प्रेम होतं हे दिसून आलं.