‘बिग बॉस १४’ फेम गायक राहुल वैद्य आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री दिशा परमार यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट करत सगळ्यांना आनंदाची बातमी दिली. “मी बाबा झालो” म्हणत चाहत्यांबरोबर त्याने सुंदर क्षण सेलिब्रेट केले. १४ नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या लेकीचा बारसं केला आणि तिचे ‘नव्या’ असे गोड नावदेखील ठेवले. या सोहळ्याला त्यांचे कुटुंबीय व जवळचे काही मित्र उपस्थित होते. याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. (Rahul Vaidya Shared Her Daughter’s Photo)
गरोदरपणातील प्रत्येक खास क्षणही तिने आनंदाने साजरे केले होते. दिवाळीच्या मुहूर्तावर लेकीचं बारसं करायचं असं दोन्ही कुटुंबीयांचं ठरलं. त्याचप्रमाणे राहुल व दिशाच्या मुलीचं बारसं पार पडलं. दिवाळी पाडव्यानिमित्त वैद्यांच्या घरी बारशाचं जोरदार सेलिब्रेशन झालं. या सेलिब्रेशनचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच आता राहुलचे त्याच्या मुलीबरोबरचे आणखी काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राहुलने आपल्या लेकीबरोबर शेअर केलेले हे फोटो चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरले आहेत. या फोटोंत राहुल-दिशाने आपल्या लेकीला हातात धरलं आहे आणि ते तिच्या कपाळावर किस करताना दिसत आहेत. अशातच त्याच्या दुसऱ्या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राहुलने या फोटोत लेकीच्या पावलांना स्पर्श करत स्वत:चं डोकं तिच्या पावलांवर ठेवल पायांना किस केलं आहे. हा खास क्षण त्याने चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. यावरून राहुलचे आपल्या लेकीवर किती प्रेम आहे हे दिसून येते.
राहुलने शेअर केलेल्या या फोटोला कलाकारांनी व चाहत्यांनी लाईकस-कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर लेकीच्या पायांना किस करण्याच्या या कृतीमुळे राहुलचे सोशल मीडियाद्वारे कलाकारांकडून आणि त्यांच्या चाहत्यांकडून प्रशंसा व कौतुक केलं जात आहे.