Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुखने यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. ग्रहमख, मेहंदी समारंभानंतर हळदी समारंभास सुरुवात झाली आहे. आज प्रसाद अमृताची हळद असून त्यांच्या हळदीचे अनेक फोटोस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाआधीचे विधीचे अनेक फोटोस व्हायरल झाले असून यांत ग्रहमखच्या वेळी अमृता प्रसादचा पारंपरिक लुक लक्ष वेधून घेत होता. त्यानंतर त्यांच्या मेहंदी समारंभाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. (Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding)
अशातच आज असलेल्या प्रसाद-अमृताच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रसाद अमृताला हळद लागली असून प्रसाद-अमृताच्या हळदीच्या लूकमध्ये दोघेही खूप गोड दिसत आहेत. हळदीनंतर दोघेही थिरकताना ही दिसत आहेत. पिवळ्या रंगाच्या लेहंगा आणि फुलांचे घातलेले दागिने यांत अमृता खूप सुंदर दिसत आहे तर प्रसादनेही पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. हळद लागल्यानंतर दोघांच रूप अगदी खुलून आलेलं पाहायला मिळतंय. अमृताच्या हातावरची नक्षीदार मेहंदी रंगलेली पाहायला मिळतेय.
अमृता प्रसादच्या हळदीला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनीही हजेरी लावली आहे. ही कलाकार मंडळी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रसाद अमृताच्या हळदीचे अनेक फोटोस, व्हिडीओस ही पोस्ट करताना दिसत आहेत. अभिनेत्री नम्रता संभेराव हिने भावाच्या म्हणजेच प्रसाद जवादेच्या लग्नाला सहकुटुंब हजेरी लावली आहे. नम्रता व प्रसाद यांचं बहीण भावाचं नातं आहे. त्यामुळे तिने सहकुटुंब हजेरी लावली आहे. याशिवाय इतरही कलाकार मंडळी प्रसाद अमृताच्या लग्नाला हजर असलेले पाहायला मिळत आहेत.
‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रमातून एकत्र आलेल्या या जोडीमध्ये सुरुवातीला मैत्रीपूर्ण नातं होतं. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला. नात्याची कबुली दिल्यानंतर त्यांनी गुपचूप घरच्या घरीच साखरपुडा सोहळा उरकला, त्यानंतर साखरपुड्याचे खास फोटो त्यांनी चाहत्यांसह शेअर करत साखरपुडा उरकल्याची खुशखबर दिली होती. प्रसाद अमृता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते चाहत्यांसह काही ना काही पोस्ट करून त्यांच्या संपर्कात राहत असतात.