शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हा माझा शेवटचा चित्रपट असेल पण…”, ‘झिम्मा २’बाबत बोलताना सुचित्रा बांदेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, “२५ वर्षांमध्ये…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 17, 2023 | 7:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suchitra Bandekar Jimma 2 Trailer Launch Interview

"हा माझा शेवटचा चित्रपट असेल पण…", 'झिम्मा २'बाबत बोलताना सुचित्रा बांदेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, "२५ वर्षांमध्ये…"

मराठी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी नाटक, चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘झिम्मा’, ‘फुल्ल ३ धमाल’ यांसारख्या अनेक चित्रपटात त्या झळकल्या आहेत. मात्र, ‘झिम्मा’ आणि ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटांमधून त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. सुचित्रा यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात पल्लवी ही भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. शिवाय, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळालं आहे. ‘बाईपण भारी देवा’ नंतर सुचित्रा बांदेकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाल्या आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये त्या ‘वैशाली’ ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. (Suchitra Bandekar Jimma 2 Trailer Launch Interview)

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, नुकतंच चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला होता. त्यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. या ट्रेलर लाँच सोहळ्यानिमित्त अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी ‘इट्स मज्जा’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना एक वक्तव्य केलं, जे सध्या जोरदार चर्चेत आलं आहे.

हे देखील वाचा – Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Video : ‘बिग बॉस’ थीम, दोघांचेही फोटो अन्…; अमृता देशमुखच्या हातावरील मेहंदी आहे फारच खास, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Suchitra Bandekar (@suchitrabandekar)

या मुलाखतीत सुचित्रा यांनी सोशल मीडिया फारसं वापरत नसल्याचं सांगताना म्हणाल्या, “एकतर ती सोशल मीडियाची वॉल आहे, ते कधीही मला जमली नाही. मला फेसबुक, इंस्टाग्राम वापरणं फारसं जमत नाही. पण खूप जण मला म्हणाले की, सोशल मीडियाचा वापर करणे, हे इतकं कठीण नाही. बाकी तू एवढ्या कठीण गोष्टी करते, तर हे तुला नक्की जमेल. पण खरं सांगते, मला सोशल मीडिया वापरणं जमत नाही.” तर पुढे त्यांनी ‘झिम्मा २’बद्दल बोलताना हा माझ्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट असल्याचं म्हणाल्या आहेत. त्या असं म्हणाल्या की, “माझ्या साधारण २५ वर्षांच्या कारकिर्दीत मी केवळ आठच चित्रपट केले. तर मी आणखी काय अपेक्षा करू की, याच्याहून अजून एक चित्रपट केला असेल आणि तो येईल. सध्या माझ्या या करिअरमधला हा शेवटचा चित्रपट असेल. पण जर मी आणखीन काही चित्रपट केलेत, तर ते चित्रपट येतील.” सुचित्रा यांच्या त्या वक्तव्याची त्यांच्या चाहत्यांसह प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा रंगत आहे.

हे देखील वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन, कारण अजूनही अस्पष्ट

हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटात सुचित्रासह अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे व अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. येत्या २४ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Tags: jhimma 2suchitra bandekarSuchitra Bandekar Jimma 2 Trailer Launch Interviewupcoming marathi movie
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
bharat jadhav gurav more rutuja bagwe new movie london misal teaser release

'लंडन मिसळ'चा धमकेदार टीझर प्रदर्शित, भरत जाधवांसह ऋतुजा बागवेच्या लूकने वेधलं लक्ष, डायलॉग चर्चेत  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.