Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख. ही जोडी आता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’ या रिऑलिटी कार्यक्रमातून प्रसाद व अमृता यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रेमाची कबुली दिली आणि लवकरच लग्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता ती घटीका जवळ आली आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगले व्हायरल होताना दिसतात. गुरुवारी त्यांचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. त्याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.(Amruta Prasad attractive mehendi design video)
मेहंदीच्या कार्यक्रमासाठी दोघंही खूप छान तयार झालेले दिसले. वर व वधु पारंपारिक अंदाजात पाहायला मिळाले. अमृताने यावेळी पिवळ्या रंगाचा डिझाइनर लेहंगा घातला होता. त्या लेहंग्यावर तिने फुलांनी सजलेले व मोत्यांनी बनलेले दागिने परिधान केले होते. तर प्रसादने हिरव्या व मोती कलरचा सदरा, पायजमा परिधान केला होता. अगदी साध्या पण सुंदर पद्धतीत त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला.
अमृताच्या हातावरील मेहंदी विशेष लक्षवेधी ठरली. अमृताच्या हातावर दोघांचीही ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नेमप्लेट घेवून उभे असतानाची प्रतिकृती दिसत आहे. त्याचबरोबर तिच्या मेहंदीवर विविध फुलांची, मोराची डिझाईन पाहायला मिळाली. कमळ आणि मोराचा पिसारा हे या मेहंदीच्या डिझाइनमध्ये विशेष पाहायला मिळालं. महाल, हत्ती यांसारखे विविध डिझाईन्सने अमृताची मेहंदी भरून गेली होती. सुंदर व छान डिझाईनने नवरीच्या हातावरची मेहंदी सजली होती. तर नवऱ्या मुलानेही म्हणजेच प्रसादनेही अमृताच्या नावाची मेहंदी हातावार लावलेली दिसली. ‘अमृतमय जाहलो’, असं प्रसादने स्वतःच्या हातावर लिहून घेतलेलं पाहायला मिळालं. या कार्यक्रमाच्या व्हिडीओत दोघंही बरेच आनंदी दिसले.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. बऱ्याच नेटकऱ्यांनी लाईक व कमेंटचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने कमेटं केली, ‘साधं पण सुंदर देव तुम्हा दोघांवर कृपा करो’, असं लिहीलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, ‘खूप छान’ अशी कमेंट केली आहे. तर बऱ्याच नेटकऱ्यांनी हार्ट इमोजी शेअर करत त्यांच कौतुक केलं आहे.