शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अशी सासू हवी गं बाई! शिवानी रांगोळेने नेसली सासूबाईंची साडी, व्हिडीओही केला शेअर, म्हणाली, “सासूची…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 16, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shivani Rangole Post

अशी सासू हवी गं बाई! शिवानी रांगोळेने नेसली सासूबाईंची साडी, व्हिडीओही केला शेअर, म्हणाली, "सासूची…"

अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने आजवर तिच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मराठी चित्रपट व मालिकांमधून शिवानीने प्रेक्षकांची मन जिंकली. शिवानी रांगोळेसह तिचं सासरचं कुटुंबही सिनेसृष्टीत सक्रिय आहे. तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णी व नवरा विराजस कुलकर्णी यांचा देखील सिनेसृष्टीतील वावर बऱ्यापैकी मोठा आहे. शिवानी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. शिवानी व मृण्मयी यांची सासू सूनेची जोडीही नेहमीच चर्चेत असते. (Shivani Rangole Post)

सध्या शिवानी मुख्य भूमिका साकारत असलेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत काम करत आहे. ही मालिका अवघ्या कमी कालावधीत प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. मालिकेत शिवानी रांगोळे साकारत असलेल्या अक्षराच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनयासह शिवानी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील घडामोडी, सेटवरच्या गमती-जमती नेहमीच सोशल मीडियावरुन शेअर करत असते.

आणखी वाचा – अयोध्यामध्ये हेमा मालिनी नृत्य सादर करणार, राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जय्यत तयारी, म्हणाल्या, “मी पहिल्यांदाच…”

View this post on Instagram

A post shared by Shivani Rangole Kulkarni (@rangshivani)

अशातच नुकतंच शिवानीने सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. साडी नेसून शेअर केलेल्या या फोटोखालील कॅप्शनने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवानीने या फोटोत तिची सासू म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची साडी नेसली असल्याचं पाहायला मिळत आहे. तर शिवानीने या फोटोला “जेव्हा तुम्ही तुमच्या सासूची साडी नेसता तेव्हा तुमचं सौंदर्य अजून खुलून दिसतं” असं खास कॅप्शन दिलं आहे. शिवानी व मृणाल कुलकर्णी ही सासू-सूनेची जोडी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध सासू-सूनांपैकी एक आहे. या दोघी अनेकदा एकमेकींची स्तुती करतानाही दिसल्या आहेत. याशिवाय शिवानीचा हा खास फोटो तिचा नवरा विराजस कुलकर्णी याने काढलेला आहे, असंही ती म्हणाली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “अजूनही त्याचे वडील…”, अंकिता लोखंडेच्या आईचा मोठा खुलासा, अजूनही सुशांत सिंह राजपूतचं कुटुंब संपर्कात, म्हणाली, “मुलीसारखं प्रेम अन्…”

शिवानीने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. सध्या शिवानी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षराची भूमिका साकारत आहे. मालिकेत सध्या अक्षरा-अधिपती मध्ये वाद-विवाद होत असताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे अक्षरा-अधिपती या दोघांचं नातं आता कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणंही रंजक ठरणार आहे.

Tags: entertainmentmarathi actressmarathi serialshivani rangoleshivani rangole instagram
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Ankita lokhandes husband Vicky jain gifted ankita lokhande villa in Maldives worth 50 crores rs

लग्नात बायकोला दिलं ५० कोटी रुपयांचं गिफ्ट, आता 'बिग बॉस १७'मधील बहुचर्चित कपल घटस्फोटाच्या मार्गावर, सासूबाईंशीही पटेना अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.