अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने आजवर तिच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मराठी चित्रपट व मालिकांमधून शिवानीने प्रेक्षकांची मन जिंकली. शिवानी रांगोळेसह तिचं सासरचं कुटुंबही सिनेसृष्टीत सक्रिय आहे. तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णी व नवरा विराजस कुलकर्णी यांचा देखील सिनेसृष्टीतील वावर बऱ्यापैकी मोठा आहे. शिवानी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. शिवानी व मृण्मयी यांची सासू सूनेची जोडीही नेहमीच चर्चेत असते. (Shivani Rangole Post)
सध्या शिवानी मुख्य भूमिका साकारत असलेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत काम करत आहे. ही मालिका अवघ्या कमी कालावधीत प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. मालिकेत शिवानी रांगोळे साकारत असलेल्या अक्षराच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनयासह शिवानी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील घडामोडी, सेटवरच्या गमती-जमती नेहमीच सोशल मीडियावरुन शेअर करत असते.
अशातच नुकतंच शिवानीने सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. साडी नेसून शेअर केलेल्या या फोटोखालील कॅप्शनने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवानीने या फोटोत तिची सासू म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची साडी नेसली असल्याचं पाहायला मिळत आहे. तर शिवानीने या फोटोला “जेव्हा तुम्ही तुमच्या सासूची साडी नेसता तेव्हा तुमचं सौंदर्य अजून खुलून दिसतं” असं खास कॅप्शन दिलं आहे. शिवानी व मृणाल कुलकर्णी ही सासू-सूनेची जोडी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध सासू-सूनांपैकी एक आहे. या दोघी अनेकदा एकमेकींची स्तुती करतानाही दिसल्या आहेत. याशिवाय शिवानीचा हा खास फोटो तिचा नवरा विराजस कुलकर्णी याने काढलेला आहे, असंही ती म्हणाली आहे.
शिवानीने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. सध्या शिवानी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षराची भूमिका साकारत आहे. मालिकेत सध्या अक्षरा-अधिपती मध्ये वाद-विवाद होत असताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे अक्षरा-अधिपती या दोघांचं नातं आता कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणंही रंजक ठरणार आहे.