मनोरंजन विश्वात अनेक कलाकार मंडळी मोठ्या थाटामाटात विवाह करत असतात. अनेक् कलाकारांची लग्न ही अगदी शाही पद्धतीने आणि दिमाखात पार पडल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या लग्नात एकमेकांना महागड्या भेटवस्तूही देत असतात. अशीच एक अभिनेत्री आहे, जिला तिच्या लग्नात पतीकडून तब्बल ५० कोटी रुपयांचे गिफ्ट मिळाले होते आणि ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून अंकिता लोखंडे आहे. पती विकी जैनने अंकिताला लग्नात ५० कोटी रुपयांची खास भेटवस्तू दिली होती.
बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन १४ डिसेंबर रोजी लग्न बंधनात अडकले. विकीने अंकिताला लग्नात भेट म्हणून मालदीवमध्ये एक व्हिला गिफ्ट केला आहे. या व्हिलाची किंमत ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर अंकितानेदेखील विकीसाठी एक खासगी यॉट भेट म्हणून दिली आहे. या यॉटची किंमत ही ८ कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
यंदाच्या ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात अंकिता-विकी या जोडीने एकत्र या शोमध्ये एण्ट्री घेतली. पण या शोमध्ये दोघेही अनेकदा भांडताना दिसले आहेत. अनेकवेळा विकीने अंकितावर आरडाओरड केली आहे, तर अनेकवेळा अंकिताही विकीवर रागावतानाही दिसली आहे. या शोमध्ये दोघांमधील भांडण अनेकवेळा इतके टोकाला गेले असल्याचे पाहायला मिळाले आहे की, या भांडणांमुळे अंकिताने विक्कीपासून दूर जाण्याबद्दलही भाष्य केले आहे.
गेले काही दिवस या दोघांमधले वाद खूपच विकोपाला गेले असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच या घरात विकीच्या आईने एण्ट्री घेतली होती तेव्हादेखील त्यांनी अंकिता-विकी यांच्या नात्यावर भाष्य केले होते. अशातच नुकत्याच झालेल्या एका भागांत अंकिताने विकीला “मी तुझ्या आयुष्यातून जात आहे” असं म्हटलं. यावरुन सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
हेही वाचा – मिताली मयेकरच्या साध्या पण हटके मंगळसूत्राच्या डिझाइनने वेधलं लक्ष, आहे फारच खास, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, ‘बिग बॉस’मध्ये आल्यापासून या दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले असल्याचे पहायला मिळाले आहे. तसेच त्यांच्या नात्याबद्दलही अनेकदा चर्चा रंगल्या आहेत. पण आता स्वत: अभिनेत्रीने असे विधान केल्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे.