Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’च्या घरात सध्या अंकिता लोखंडे व विकी जैन यांचा वाद सुरु असलेला पाहायला मिळत आहे. दोघांमधील भांडणाची चर्चा आता शोच्या बाहेरही रंगली आहे. अंकिताने तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतचा शोमध्ये अनेकदा उल्लेख केला आहे. अंकिताने सुशांतचा केलेला उल्लेख तिच्या सासूबाईंना म्हणजेच विकीच्या आईला आवडला नाही. इतकंच नव्हे तर नेटकऱ्यांनी सुशांतचे नाव घेतल्याने अंकिताला ट्रोलही केले आहे. दरम्यान, अभिनेत्रीची आई वंदना लोखंडे यांनी एक मोठा खुलासा केला आहे.
अंकिताची आई वंदना लोखंडे यांनी नुकतीच मीडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अंकिता व सुशांतच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, “त्यांच्यातील नाते खूप घट्ट आहे. ज्याचे ते स्वतः साक्षीदार आहेत. ती सुशांत व अंकिताबरोबर राहिली आहे. वंदना लोखंडे म्हणाल्या, “मी दोघांबरोबर एकाच घरात राहिले आहे आणि सुशांतला मी सात वर्षांपासून ओळखत होते. अंकिताचे त्याच्यावर खूप प्रेम होते. अशा परिस्थितीत स्वतःला सांभाळणे तितके सोपे नसते. अंकिता खूप भावूक व्यक्ती आहे” असंही त्या म्हणाल्या.
याशिवाय अंकिताच्या आईने विक्की जैनचे कौतुक केलेलं पाहायला मिळालं. त्या म्हणाल्या, “तो नेहमी अंकिताच्या पाठीशी उभा राहिला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता खूपच कोलमडली होती तेव्हा तो तिच्याबरोबर होता. तो नेहमीच अंकिताच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. मी विकीला चांगलं ओळखते, मी त्याला माझा मुलगाच मानते” असंही त्या म्हणाल्या.
पुढे, सुशांतबद्दल बोलताना अंकिताची आई म्हणाली, “सुशांत खूप चांगला माणूस आणि खूप हुशार होता. आजही सुशांतची बहीण श्वेता व राणी अंकिताशी फोनवर बोलतात. त्याचे वडील केके सिंह देखील अंकिताला काही दिवसांतून एकदा फोन करतात. सुशांतचे कुटुंबीय अजूनही अंकितावर त्यांच्या मुलीसारखे प्रेम करतात” असंही त्या म्हणाल्या. अंकिताच्या आईने सांगितले की, “तिची मुलगी आपले नाते वाचवण्यासाठी काहीही करु शकते”.