बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अयोध्यामध्ये हेमा मालिनी नृत्य सादर करणार, राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जय्यत तयारी, म्हणाल्या, “मी पहिल्यांदाच…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 16, 2024 | 5:41 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood actress hema malini will be perform dance drama based on ramayan in ayodhya see the details

अयोध्यामध्ये हेमा मालिनी नृत्य सादर करणार, राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जय्यत तयारी, म्हणाल्या, "मी पहिल्यांदाच..."

उत्तर प्रदेशच्या अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सहभागी होणार आहेत. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यादेखील या खास कार्यक्रमात त्यांचा एक परफॉर्मन्स सादर करणार आहेत. स्वत: हेमा मालिनी यांनी एक खास व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे.  त्या रामायणावर आधारित नृत्यनाटिका सादर करणार असून त्या आणि त्यांची टीम याची तयारी करत आहे.

हा व्हिडीओच्या सुरुवातीलाच त्यांनी जय श्री राम म्हटले. तसेच हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी असे म्हटले आहे की, “मी पहिल्यांदाच अयोध्येत येत आहे आणि तेही अशा वेळी जेव्हा राम लल्ला मंदिराचे उद्घाटन होणार आहे. पद्मविभूषण तुलसीपीठाधीश्‍वर जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी रामभद्राचार्यजी महाराज यांचा ७५वा जयंती अमृत महोत्सव १४ ते २२ जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे.”

#WATCH | BJP leader Hema Malini says, "…I am coming to Ayodhya for the first time at the time of the 'pranpratishtha' of Ram Temple for which people were waiting for years…On January 17, I'll be presenting a dance drama based on Ramayana in Ayodhya Dham…"

(Source: Hema… pic.twitter.com/TjY34WTFNO

— ANI (@ANI) January 14, 2024

हेही वाचा – मिताली मयेकरच्या साध्या पण हटके मंगळसूत्राच्या डिझाइनने वेधलं लक्ष, आहे फारच खास, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

यापुढे त्यांनी असे म्हटले की, “तेव्हा या मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने १७ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता श्री अयोध्या धाम येथे माझ्या संपूर्ण टीमसह रामायणावर आधारित एक नृत्यनाट्य सादर करणार आहे. चला तर मग आपण सगळे मिळून हा खास सोहळा साजरा करण्यासाठी अयोध्या धाममध्ये एकत्र येऊ या.”

हेही वाचा – “आमचा जलवा…”, पहिल्या मकरसंक्रांतीसाठी अमृता-प्रसादचा एकमेकांसाठी लाजत खास उखाणा, अभिनेत्री म्हणाली, “साम्राज्याच्या…”

दरम्यान, अक्षय कुमार, कंगना रणौत, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, हरिहरन, रजनीकांत, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि रणदीप हुडा यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींना अयोध्येतील राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यासाठी आमंत्रण मिळाले आहे.

Tags: मनोरंजन बातमीबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड मनोरंजनबॉलिवूड बातमीहेमा मालिनीbollywood actressBollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood newsentertainment newshema malini
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Dhanashri Kadgaonkar Post

"ब्रा मधील फोटो हवा", 'तू चाल पुढं'मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, संतापून म्हणाली, "अशा लोकांचं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.