‘आपला माणूस’ म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण करत मराठीसह हिंदी सिनेविश्वात दबदबा निर्माण करणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे शिव ठाकरे. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे व निरागस हास्याने शिवने अनेकांची मनं जिंकली आहेत. तसेच आपल्या डान्सने व दिलखुलास स्वभावामुळे चर्चेत राहणारा शिव गेल्या काही दिवसांत चांगलाच चर्चेत आला आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे अभिनेत्याला आलेलं ईडी समन्स.
शिव ठाकरे व अब्दू रोजिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहेत. एका मोठ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्ष देण्यासाठी त्यांना बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शिव चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच आता पुन्हा एकदा त्याच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. शिव ‘झलक दिखला जा ११’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. पण फिनाले आधीच शिव या कार्यक्रमातून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या एक्झिटवर त्याच्या अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
All they did was dirty politics to him still he is leaving the show with a wide smile and with all the respect ????????❤️
— BornToShine???? (@TheAliya2) February 24, 2024
He was far more better than many there deserved everything but as he said it's not the end ❤️!
Proud of you boyy ❤️!#ShivThakare #ShivKiSena pic.twitter.com/LHOw8QeKge
‘झलक दिखला जा’मध्ये शिवने अनेक धमाकेदार परफॉर्मन्स केल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या अनेक परफॉर्मन्सला चाहत्यांनीदेखील चांगलीच पसंती दर्शवली. मात्र, असे असतानाही ऐन फिनालेला काही दिवस शिल्लक असतानाच शिवला या शोमधून बाहेर पडावे लागली आहे. त्यामुळे त्याचे अनेक चाहते शोच्या निर्मात्यांवर चांगलेच नाराज झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर या शोबद्दल व शोच्या निर्मात्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
Honestly this was a biased and wrong eviction ????
— ???????????????????????????????????????????????? ????️ (Vote for Manisha) (@ruthaparinda) February 24, 2024
He actually deserved to be one of the finalist !
Much luck and Best wishes for future @ShivThakare9 #ShivThakare#ManishaRani #ManishaSquadpic.twitter.com/oDp1SazXnj
सोशल मीडियावर शिवच्या चाहत्यांनी “सर्वांनी राजकारण केलं आहे, शिव ठाकरेच या कार्यक्रमाचा विजेता आहे, शिवला आम्ही ‘बिग बॉस’पासून पाठिंबा देत आहे. शिव ठाकरेचा आजपर्यंतचा प्रवास आम्ही पाहिला आहे. नकारानंतरही शिव मेहनत घेतो, शिव ठाकरे ‘टॉप ५’मध्ये असायला हवा होता, शिव ठाकरेच ‘झलक दिखला जा ११’चा खरा विजेता आहे” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, मनीषा रानी, धनश्री वर्मा, शोएब इब्राहिम, अद्रिजा सिन्हा आणि श्रीराम चंद्र हे ‘झलक दिखला जा ११’चे ‘टॉप ५’ स्पर्धक आहेत. येत्या ३ मार्च २०२४ रोजी या शोचा महाअंतिम सोहळा होणार आहे. त्यामुळे आता या शोचा विजेता कोण होणार? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.