गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात अनेक घडामोडी घडताना दिसून येत आहेत. गेल्या अनेक दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणाची व राजकारण्यांची पातळी घसरलेली पाहायला मिळत आहे. त्यात नुकताच अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने अवघा महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्रातील या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर सामान्य नागरिकांसह अनेक कलाकार मंडळीदेखील त्यांचे मत व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने या सर्व परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
अलीकडच्या काळात अनेक मराठी कलाकार राजकारण, समाजकारण यावर ठामपणे आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतात. यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी पंडीत. गेले काही दिवस तेजस्विनी सध्याचे राजकारण व समाजकारणावर तिची ठाम भूमिका मांडताना दिसत आहे. अशातच तिने नुकतीच केलेली एक एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात झालेले गोळीबार व नुकतेच पुण्यात सापडलेलं सर्वात मोठं ड्रग्ज रॅकेट यावर तेजस्विनीने नाराजी व्यक्त केली आहे.
दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्ष सतावत आहेतच…
— TEJASWWINI (@tejaswwini) February 25, 2024
आता सर्रास गोळीबार , खून, ड्रग्ज….?
असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता ????
तेजस्विनीने तिच्या पोस्टच्या माध्यमातून राज्यातील सद्य सामाजिक स्थितीबाबत मोठा सवाल उपस्थित केला आहे. तसेच आपला महाराष्ट्र असा कधीच नव्हता असं मत मांडत तिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तेजस्विनीने तिच्या या पोस्टमध्ये नाराजी व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्षे सतावत आहेतच… आता सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज….? आपला महाराष्ट्र असा कधीच नव्हता”.
दरम्यान, तेजस्विनीची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तेजस्विनीच्या या पोस्टखाली अनेक संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत. कुणी तेजस्विनीच्या या पोस्ट पाठिंबा दिला आहे. तर कुणी तेजस्विनीला तिच्या या पोस्टला कमेंट्स करत असहमती दर्शवली आहे.