गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुहूर्त ठरला, मंडपही सजला! सिद्धार्थ-तितीक्षाच्या लग्नाची जय्यत तयारी, ‘या’ ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात होणार लग्न

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 26, 2024 | 11:36 am
in Entertainment
Reading Time: 4 mins read
google-news
Siddharth Bodke and Titeeksha Tawde wedding will be held at this place

मुहूर्त ठरला, मंडपही सजला! सिद्धार्थ-तितीक्षाच्या लग्नाची जय्यत तयारी, ‘या’ ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात होणार लग्न |

मराठी मनोरंजन विश्वात सध्या जोरदार लगीनघाई सुरु आहे. नुकताच प्रथमेश परब ही विवाहबंधनात अडकल्यानंतर आता पूजा सावंतदेखील विवाहबंधनात अडकणार आहे. अशातच छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय जोडीदेखील बोहोल्यावर चढायला सज्ज झाली आहे आणि ही लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके. नुकतेच या दोघांचे लग्नाआधीचे विधी पार पडले असून या विधींचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अशातच सिद्धार्थ व तितीक्षा हे दोघे आता लवकरच विवाहबंधनात अडकणार असून दोघांच्या लग्नाचा खास मंडपदेखील सज्ज झाला आहे. नयनरम्य ठिकाणी सिद्धार्थ व तितीक्षा यांचा विवाहसोहळा पार पडणार असून या मंडप सोहळ्यासाठी खास सजावटदेखील करण्यात आली आहे. रंगीबेरंगी पडदे अन् आकर्षक फुलांच्या माळांनी सिद्धार्थ व तितीक्षा यांच्या लग्नाचा मदनप सजवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या लग्नमंडपातील फुलांनी सजवलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – मेहंदी है रचनेवाली! पूजा सावंतच्या हातावर रंगली सिद्धेशच्या नावाची मेहंदी, अभिनेत्रीच्या खास लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

नुकताच तितीक्षा व सिद्धार्थ यांचा साखरपुडा समारंभ सोहळा पार पडला. साखरपुड्यातील खास फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी तितीक्षा व सिद्धार्थचा खास लूकही प्रेक्षकांना अधिक भावला. साखरपुड्यानंतर या दोघांचा हळदी समारंभ सोहळादेखील मोठ्या थाटात पार पडला. अनेक कलाकारांनीही सिद्धार्थ व तितीक्षाच्या हळदीत धमाल-मस्ती केलेली पाहायला मिळाली. शिवाय सिद्धार्थचा त्याच्या वडिलांबरोबरचा हळदीतील डान्सही तुफान व्हायरल होत आहे. हळदी समारंभासाठी दोघांनी पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – Video : तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेच्या हळदीत मराठी कलाकारांचा तुफान राडा, जबरदस्त डान्स अन्…; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, संगीत, हळदी समारंभानंतर आता हे दोघे एकमेकांबरोबर विवाह करण्यासाठीदेखील सज्ज झाले आहेत. गेले अनेक दिवस या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती आणि अखेर आता ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना दोघांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.     

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding News in Marathi

वऱ्हाड निघालं लग्नाला!, तितीक्षा तावडेच्या लग्नाला निघाले 'सातव्या मुलीची…'मधील कलाकार, नाकात नथ घालून गाडीमध्येच ऐश्वर्या नारकरांचा डान्स अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.