बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. २०२१ मध्ये राज एका वादग्रस्त प्रकरणात अडकला होता. याप्रकरणी त्याला अटकदेखील झाली होती, मात्र काही महिन्यांनी तो तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर तो अनेक ठिकाणी वेगवेगळे मास्क घालून फिरताना दिसला आहे. तेव्हापासून त्याला ‘मास्क मॅन’ असं नाव पडलं गेलं. मात्र, यांमुळे त्याला अनेकदा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. आता अभिनेत्रीच्या पतीने यावर मौन सोडत मोठं विधान केलं आहे. (Raj Kundra Standup Comedy Video)
राज कुंद्राने नुकतंच प्रसिद्ध कॉमेडीयन मूनव्वर फारूकीच्या आग्रहाखातर ‘इंडी हॅबीटाट’च्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी चेहऱ्यावर मास्क परिधान करत राजने दमदार एंट्री करताना दिसला असून तो मंचावर येताच स्टँडअप कॉमेडी करताना दिसतो. या निमित्ताने राज प्रथमच स्टँडअप कॉमेडियनच्या अवतारात दिसला असून त्याचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – कॅन्सरमुळे डगमगले, २० किलो वजन घटलं; जीवघेण्या आजारावर अतुल परचुरेंची मात, नाटकामधून करत आहेत कमबॅक
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये राज स्वतःची मास्क मॅन, शिल्पाचा पती, आणि स्वस्तातील कायने वेस्ट अशी ओळख करून देतो. याचबरोबर तो आपल्या जुन्या व्यवसायाबद्दल बोलताना म्हणाला, “वयाच्या १८ व्या वर्षी मी लंडनमध्ये टॅक्सी चालवायचो, २१ व्या वर्षी पश्मीना शालीचा व्यवसाय वाढवत साम्राज्य निर्माण केलं. त्यामुळे माझं काम आधीपासूनच कपडे परिधान करून द्यायचं होतं, कपडे उतरवण्याचं कधीच नव्हतं.” त्याच्या या विनोदाला उपस्थित प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली.
हे देखील वाचा – “घरात कपडे न घालताच फिरते”, उर्फी जावेदचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “मोठं घर खरेदी केलं कारण…”
राजने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून ज्यात त्याने मुनव्वरचे आभार मानले आहे. दरम्यान, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी राजला जोरदार ट्रोल केलं. त्याचबरोबर मुनव्वर फारुकीवरदेखील टीका केली आहे. मात्र, काहींनी त्याच्या या विनोदाला दाद दिली. राज कुंद्राच्या स्टँडअपचा हा टीझर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.