सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॅन्सरमुळे डगमगले, २० किलो वजन घटलं; जीवघेण्या आजारावर अतुल परचुरेंची मात, नाटकामधून करत आहेत कमबॅक

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 5, 2023 | 12:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Atul Parchure cameback in Theatre after long battle with Cancer

जीवघेण्या आजारावर अतुल परचुरेंची मात, नाटकामधून करत आहेत कमबॅक

अभिनेते अतुल परचुरे यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मनोरंजनसृष्टी गाजवली आहे. रंगभूमी असो किंवा रुपेरी पडदा, सर्वच माध्यमांत साकारलेल्या विविधांगी भूमिकांमधून त्यांनी त्यांच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्यांनी आपला डंका वाजवला आहे. एकीकडे त्यांचं करिअर जोमाने सुरु असताना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. पण, त्यांनी या रोगाशी यशस्वी लढा दिला व ते यातून पूर्णपणे बरे झाले. गंभीर आजारावर मात करत अतुल परचुरे आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. ‘खरं खरं सांग’ या नाटकाच्या निमित्ताने ते रंगभूमीवर पुनरागमन करणार आहे. (Atul Parchure cameback in Theatre after long battle with Cancer)

फ्रेंच नाटककार फ्लॉरियन झेलर यांच्या गाजलेल्या ‘द ट्रूथ’ या नाटकावर आधारित ‘खर खरं सांग’ हे नाटक सध्या रंगभूमीवर जोरदार गाजत आहे. नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकात राहुल मेहेंदळे, सुलेखा तळवलकर, ऋजुता देशमुख आणि आनंद इंगळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. यातील अनेक कलाकार नाटकाचे प्रयोग करण्याबरोबरच त्यांच्या मालिकेसाठी देखील वेळ काढत आहे. लवकरच या नाटकाचा अमेरिका दौरा होणार आहे. पण, राहुल मेहेंदळे आणि सुलेखा तळवलकर हे त्यांच्या मालिकांच्या व्यग्र चित्रीकरणामुळे या नाटकाच्या दौऱ्यात सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळे या दौऱ्यात राहुल त्यांच्या जागी अतुल परचुरे, तर सुलेखा यांच्या जागी अभिनेत्री मुग्धा गोडबोले दिसणार आहेत.

हे देखील वाचा – “मराठी संस्कृतीचं वाटोळं करा”, मिताली मयेकरने बिकिनी परिधान करत शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी भडकले, बोल्ड लूक पाहून म्हणाले, “पूर्ण कपडे घालायचा हिला…”

अतुल यांचा हा व्हिडिओ नाटकाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून ज्यामध्ये ते या नाटकाच्या अमेरिका दौऱ्याची माहिती दिली आहे. शिवाय, या दौऱ्याआधी मुंबईत चार प्रयोग होणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले आहे. “आजारपणामुळे मी मधल्या काळात काम करू शकलो नव्हतो, त्यामुळे मला काम करण्याची प्रचंड इच्छा होती. त्यातच मला या भूमिकेविषयी विचारणा झाली आणि मी लगेच होकार दिला. यानिमित्ताने मला पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर सादरीकरण करता येतं का? हे पाहणं गरजेचं होतं. जरी मी या नाटकाचे मोजके प्रयोग करत असलो, तरी हा अनुभव खूप काही देऊन जाणारा असेल.”, असं अतुल परचुरे यावेळी म्हणाले.

हे देखील वाचा – बाबांनी डोळे वर केले, तोंडातून फेस अन्…; वडिलांची झालेली ‘ती’ अवस्था सांगताना प्रार्थना बेहरे कोसळलं रडू, म्हणाली, “हृदयविकाराचा झटका आला आणि…”

View this post on Instagram

A post shared by Khara Khara Sang (@kharakharasang)

‘खर खरं सांग’ नाटकात अतुल हे ‘रजत’च्या भूमिकेत, तर मुग्धा ‘इरा’ची भूमिका साकारणार आहेत. नाटकाच्या निमित्ताने अतुलसह मुग्धा पुन्हा एकदा रंगभूमीवर दिसणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

Tags: atul parchureAtul Parchure cameback in Theatre after long battle with Canceratul parchure fight against cancerkhara khara sangmarathi natak
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Uorfi Javed Shocking News

“घरात कपडे न घालताच फिरते”, उर्फी जावेदचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “मोठं घर खरेदी केलं कारण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.