बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनित्यांपैकी एक म्हणजे मिस्टर परफेक्ट आमिर खान. त्याने बऱ्याच चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘थ्री इडियट्स’, ‘पीके’ यांसारख्या विविध चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण आमिर सध्या चित्रपटसृष्टीपासून गायब झालेला दिसत आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटानंतर त्याचा कोणताच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. आमिरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र त्यानंतर तो कोणत्याच चित्रपटात दिसला नाही. त्यामुळे त्याने चित्रपटातून ब्रेक घेतलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान तो एका वाढदिवसाच्या पार्टीला गेलेला पाहायला मिळाला. त्यावेळचा त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होता आहे. त्याच्या व्हिडिओवर नेटकरी कमेंट करत नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसत आहे. (Aamir khan trolled by people)
व्हायरल झालेल्या व्हिडिओत आमिरचा एक वेगळा लूक पाहायला मिळाला. त्याने पांढरा-निळ्या रंगाचा कुर्ता आणि गडद निळ्या रंगाचा पायजमा घातला होता. केस वाढलेले कुरळे व थोडेसे विस्कटलेले दिसत आहेत. यावेळी त्याने चष्माही लावला होता. आमिर दरवाजाने बाहेर आला त्याचवेळी दुसऱ्या बाजूने अभिनेत्री जेनेलिया आत जात होती. मात्र आमिर त्यावेळी थोडा लडखडला.
त्यावेळी जेनेलिया काहीही न बोलता आत गेली आणि मागे वळून आमिरला बघत होती. आमिर बाहेर आल्यानंतर स्वतःच्या मिशीवर हात फिरवताना दिसला. तेव्हाच तिथल्या गार्ड्सनी त्याला आत जाण्याची विनंती केली. त्यानंतर तो आत जाताना दिसला. आमिर त्यावेळी दारुच्या नशेत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी बरेच कमेंट करत ट्रोल करताना दिसत आहेत.
आणखी वाचा – गौतमी पाटीलला कोकणात प्रवेश नाही, कार्यक्रमाला विरोध, पण यामागचं नेमकं कारण काय?
आमिरने दारु पिली असंही काही जणांचं म्हणणं आहे. काहींनी तर त्याला दारु कमी पिण्याचंही सूचवलं. एका नेटकऱ्याने, ‘आमिरला काय झालं आहे? कुठे त्याला परफेक्शनिस्ट बोललं जायचं आणि हा कसा छपरी दिसत आहे’, असं म्हणत त्याच्या लूकवर ट्रोल केलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘जास्त झाली का याला दारु?’, असं लिहीत कमेंट केली आहे.