प्रसिद्ध कलाकार आणि त्यांच्या कुटुंबियांची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगताना दिसते. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख तर या यादीत नेहमी अग्रेसर असतो. पण सध्या शाहरुखबरोबरच तिची मुलगी सुहाना प्रचंड चर्चेत आहे. सुहाना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावरही लाखो फॉलोवर्स आहेत. सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओची सगळीकडे चर्चा आहे. नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडिओला कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.(Suhana Khan Gave Money To Women)
मुंबईतील एका इव्हेंटमध्ये सुहाना खान तिची आई गौरी खानसह पोहोचली होती. कार्यक्रमामधून घरी जात असताना पापाराझी छायाचित्रकारांनी तिला घेरलं. सुहाना तिच्या कारच्या दिशेने जात असताना काही गरजू लोकांनी तिच्याकडे पैसे मागितले. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता सुहानाने तिच्या पर्समधून महिलेला पैसे काढून दिले.
आणखी वाचा – कार्तिक आर्यन २०२३च्या अखेरीस विवाहबंधनात अडकणार? करण जोहरच्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
वाचा – काय केले नेटकऱ्यांनी कमेंट ?(Suhan Khan Gave Money To Women)
सुहानाच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला. एक नेटकरी म्हणाला, “किंग खान तुझ्या राजकुमारीकडे बघ. ही पालकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “किती गोड! अगदी बापावर गेली आहे” अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी सुहानाचं कौतुक केलं. तसंच शाहरुखचंही त्याने मुलांवर केलेल्या संस्कारांसाठी विशेष कौतुक केलं गेलं.
सुहाना लवकरच झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिस’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ती या चित्रपटामध्ये ‘वेरोनिका लॉज’ ही भूमिका साकारणार आहे. बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याने सुहानाच्या करिअरसाठी विशेष पुढाकार घेतला. ‘द अर्चिस’ चित्रपटानंतर ती करण जोहरच्या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.