बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 7, 2025 | 11:13 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
filmmaker Manish Gupta stabbed driver

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्...; संपूर्ण घटना समोर

बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने रागाच्या भरात मोठं पाऊल उचललं आहे. मनीषने त्याच्या ड्रायव्हरवर चक्क चाकूने हल्ला केला. मनीष विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यानेच याबाबत सविस्तर माहिती दिली. स्वतःच्या रागावर मनीषचं नियंत्रण राहिलं नाही. ५ जूनला (गुरुवारी) वर्सोवा येथील त्याच्या राहत्या घरी हा संपूर्ण प्रकार घडला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ६ जूनला (शुक्रवारी) मनिषवर गुन्हा दाखल करण्यात आला. मनिषकडून घडलेला हा प्रकार आणि त्याबाबतची माहिती समोर येताच अनेकांना मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण प्रकरण नक्की काय? हे सविस्तर जाणून घेऊया. (filmmaker Manish Gupta stabbed driver)

पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मनिषने त्याचा ड्रायव्हर राजीबुल इस्लाम लश्करवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तो जागीच पडला. त्याला शुद्धही नव्हती. गेल्या तीन वर्षांपासून राजीबुल मनिषसाठी काम करत आहे. तरीही द्वेषामधून ही संपूर्ण घटना घडली. राजीबुलने शुद्धीवर आल्यानंतर मनिषविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र अजूनही मनीष यांना अटक झालेली नाही. ड्रायव्हरचे वकील अली काशिफ खान मनीषच्या अटकेची मागणी करत आहेत.

आणखी वाचा – …अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

View this post on Instagram

A post shared by Manish Gupta (@manishguptawriterdirector)

तक्रारीमध्ये त्याने सांगितलं की, गेल्या तीन वर्षांपासून मी मनिष यांच्यासाठी मी काम करत आहे. २३ हजार रुपये मला पगार आहे. त्यानंतर मनिषवर ड्रायव्हरने अनेक आरोप केले. कधीच वेळेवर पगार देत नसल्याचं त्याने सांगितलं. ३० मेला मनिष यांनी मला नोकरीवरुनही काढून टाकलं. नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर राजीबुलला त्यांनी पगारही दिला नाही. पगार मागण्यासाठीच तो मनिषच्या घरी गेला होता. मात्र दरम्यान त्यांच्यामध्ये वाद सुरु झाला.

आणखी वाचा – “प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

भांडण अधिकाधिक वाढत गेलं. त्यामध्येच मनीष यांचं त्यांच्या रागावरचं नियंत्रण सुटलं. त्यांनी ड्रायव्हरवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर ड्रायव्हर जागीच कोसळला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही संपूर्ण घटना इंडस्ट्रीलाही हादरवून टाकणारी आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘सरकार’ चित्रपटामधून मनीष यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली. रहस्य, हॉस्टल, डरना जरुरी है, वन फ्राइडे नाइट सारख्या चित्रपटांचं मनीषने दिग्दर्शन केलं.

Tags: bollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 aruna irani cancer
Entertainment

केमोथेरपीला नकार, केस गळतीची भीती आणि…; ७९ वर्षीय सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला दोनदा झाला कॅन्सर, स्वतःच्याच चुकीने…

जून 3, 2026 | 10:14 am
Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Next Post
dipika kakar surgery

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्...; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.