गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे आणि अशातच काल (२१ डिसेंबर) रोजी हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘डंकी’ हा शाहरुखचा यंदाच्या वर्षातील तिसरा बिग बजेट चित्रपट आहे. त्यामुळे त्याचे लाखो चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते आणि आपल्या चाहत्यांच्या भेटीसाठी शाहरुख ‘डंकी’ चित्रपट घेऊन आला आहे. दरम्यान, ‘डंकी’ हा पहिल्याच दिवशी चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. (Dunki Movie 1st Day Collection)
राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘डंकी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भरघोस कमाई केली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या यंदाच्या वर्षातील हा सातवा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, शाहरुखच्या ‘जवान’ आणि ‘पठाण’च्या तुलनेत ‘डंकी’ने निम्म्यापेक्षा कमी कमाई केली आहे. सोशल मीडियावरदेखील चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
प्रभासच्या ‘सालार’ नंतर शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र तरीही ‘डंकी’ने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतेल आहे. विशेषत: महाराष्ट्र, दिल्ली व पश्चिम बंगालसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ‘डंकी’ने पहिल्याच दिवशी अनुक्रमे १.८१ कोटी, १.५५ कोटी व १.२२ कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान, ‘डंकी’ व ‘सालार’ या दोन प्रतिस्पर्धी चित्रपटांमध्ये सध्यातरी ‘डंकी’ने बाजी मारली आहे.
आणखी वाचा – मलायका अरोरासह घटस्फोट, गर्लफ्रेंडलाही सोडलं, आता भलत्याच मुलीबरोबर अरबाज खान करणार लग्न, तयारी सुरु
चित्रपटाची मनोरंजक कथा, कलाकारांची उत्कृष्ट कामगिरी, राजकुमार हिरानी यांचे उत्तम दिग्दर्शन तसेच शाहरुखची क्रेझ आदि कारणे चाहत्यांना ‘डंकी’ पाहायला प्रोत्साहित करत आहे. त्याचबरोबर प्रभासच्या ‘सालार’कडून स्पर्धेला सामोरे जावे लागल्यानंतरही, ‘डंकी’ने दर्शकांना आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आगामी काळात हा चित्रपट आणखी किती कमाई करणार? बॉक्स ऑफिसवर आपले स्थान टिकवून ठेवण्यात त्याला यश मिळेल की नाही? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे.