बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मलायका अरोरासह घटस्फोट, गर्लफ्रेंडलाही सोडलं, आता भलत्याच मुलीबरोबर अरबाज खान करणार लग्न, तयारी सुरु

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 21, 2023 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bollywood actor arbaaz khan getting married with makeup artist shura khaan rumours viral on social media

मलायका अरोरासह घटस्फोट, गर्लफ्रेंडलाही सोडलं, आता भलत्याच मुलीबरोबर अरबाज खान करणार लग्न, तयारी सुरु

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान हा त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. अशातच त्याच्याबाबत एक नवीन बातमी समोर येत आहे. अरबाज लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. मलायका अरोराबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज जॉर्जिया एंड्रीयानीबरोबर रिलेशनमध्ये होता. काही वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाला आणि दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. (Arbaaz Khan Getting Married)

अशातच आता अरबाजच्या आयुष्यात आणखी एका मुलीची एण्ट्री झाली आहे. इतकंच नव्हे तर दोघे त्यांच्या रिलेशनला घेऊन इतके गंभीर आहेत की ते येत्या काळात ते लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. दोघांच्या लग्नाच्या अनेक चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहेत. मलायका, जॉर्जियानंतर अरबाजच्या आयुष्यात आलेल्या या तिसऱ्या व्यक्तीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

आणखी वाचा – नवरा व आई-वडिलांसह मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला पोहोचली कार्तिकी गायकवाड, भेटवस्तूही दिली अन्…; पाहा विवाहसोहळ्याचे काही खास क्षण

न्यूज १८ च्या एका रिपोर्टनुसार, अरबाज बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट शुरा खानला डेट करत आहे. इतकेच नव्हे तर हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत. अरबाज व शुरा हे दोघे त्यांच्या नात्याबद्दल आश्वासक आहेत आणि एकमेकांबरोबर लग्न करुन ते त्यांच्या नात्याला आणखी पुढे घेऊन जाणार आहेत. त्यांच्या या लग्नाला जवळचे काही मित्र व कुटुंबीय उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे.

आणखी वाचा – ना मुंबई, ना पुणे; मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने थेट चिपळूणमध्येच केलं लग्न, रांगोळी व फुलांनी सजलेल्या मंडपाने वेधलं लक्ष

दरम्यान, अरबाज खानने १९९८ मध्ये मलायकाबरोबर लग्नगाठ बांधली होती. पण लग्नानंतर १९ वर्षांनी त्यांच्यात घटस्फोट झाला. मग अरबाज जॉर्जियाबरोबर रिलेशनमध्ये होता. मात्र तिच्याबरोबरही त्याचा ब्रेकअप झाला आणि आता तो शुराबरोबर लग्न करणार आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याचबरोबर अरबाज व शुरा यांच्या लग्नाच्या बातमीमध्ये कितपत तथ्य आहे, हे पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

Tags: arbaaz khanbollywood newsentertainmententertainment newsentertainmnet
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : "ब्रेकअपच लपवून ठेवलं अन्…", सुशांत सिंग राजपूतबद्दल पुन्हा एकदा बोलली अंकिता लोखंडे, म्हणाली, "आमचं सात वर्षांचं नातं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.