मज्जा डिजिटल पुरस्कारांची सध्या कलाक्षेत्रात चर्चा सुरु आहे. हे पुरस्कार कोणते कलाकार मंडळी पटकवणर याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे. अखेरीस ‘सहावा मज्जा डिजिटल पुरस्कारां’ची यादी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘मज्जा डिजिटल’च्या चित्रपट पुरस्कारांची यादी जाहीर झाली. त्यानंतर आता टेलिव्हिजन अवॉर्ड जाहीर झाले आहेत. ‘मीडिया वन सोल्युशन’ आणि ‘इट्स मज्जा’ प्रस्तुत ‘सहावा मज्जा डिजिटल पुरस्कारां’चा ग्रँड फिनाले आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे पुरस्कार तीन विभागात विभागले गेले आहेत. पहिला विभाग म्हणजे तांत्रिक विभाग, दुसरा विभाग म्हणजे मज्जेदार पुरस्कार, आणि तिसरा विभाग पॉप्युलर पुरस्कार. चला तर या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहुयात.
वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी –
सर्वोत्कृष्ट गेम शो – आता होऊ दे धिंगाणा (स्टार प्रवाह)
सर्वोत्कृष्ट अध्यात्मिक मालिका – जय जय स्वामी समर्थ (कलर्स मराठी)
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक – सिद्धार्थ जाधव (आता होऊ दे धिंगाणा – स्टार प्रवाह)
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत – ठिपक्यांची रांगोळी (स्टार प्रवाह)
सर्वोत्कृष्ट खलनायक – ज्ञानेश वाडेकर (ठरलं तर मग – स्टार प्रवाह)
सर्वोत्कृष्ट खलनायिका – माधवी नेमकर (सुख म्हणजे नक्की काय असतं – स्टार प्रवाह)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अतुल तोडणकर (ठिपक्यांची रांगोळी – स्टार प्रवाह)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – सुप्रिया पाठारे (ठिपक्यांची रांगोळी – स्टार प्रवाह)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अमित भानुशाली (ठरलं तर मग – स्टार प्रवाह)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – जुई गडकरी (ठरलं तर मग – स्टार प्रवाह)
सर्वोत्कृष्ट मालिका – ठरलं तर मग (स्टार प्रवाह)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – साईशा साळवी (सुख म्हणजे नक्की काय असतं – स्टार प्रवाह)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सचिन गोखले (ठरलं तर मग – स्टार प्रवाह)
मज्जेदार चॅनल ऑफ द इयर – स्टार प्रवाह
मज्जेदार कलाकार ऑफ द इयर अभिनेत्री – मधुरा वेलणकर (तुमची मुलगी काय करते – सोनी मराठी)
मज्जेदार कलाकार ऑफ द इयर अभिनेता – विवेक सांगळे (भाग्य दिले तू मला – कलर्स मराठी)