रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

फिल्टरपाड्याचा गुंड म्हणताच नेटकऱ्यावर भडकला गौरव मोरे, कमेंट करत चांगलंच सुनावलं, म्हणाला, “स्वतःच्या कुटुंबाबरोबर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 13, 2024 | 1:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gaurav More Angry On Netizen

फिल्टरपाड्याचा गुंड म्हणताच नेटकऱ्यावर भडकला गौरव मोरे, कमेंट करत चांगलंच सुनावलं, म्हणाला, "स्वतःच्या कुटुंबाबरोबर…"

अभिनेता गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय शोमधून कायमचा निरोप घेतला असल्याचं समोर आल्यापासून तो चर्चेत आला आहे. अभिनेत्याने स्वतःच याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर केली. तेव्हापासून चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे. तर सध्या गौरव मॅडनेस मचाऐंगे या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या शोमध्ये तो कुशल बद्रिके व हेमांगी कवीबरोबरच्या स्कीटदरम्यानचे व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच गौरवने शेअर केलेल्या एका व्हिडीओ क्लिपवर एका नेटकऱ्याने त्याला डिवचलं आहे. (Gaurav More Angry On Netizen)

नेटकऱ्याने कमेंट करताच गौरवनेही त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं की, “रानू मंडल झाला आहे बिचारा गौरव, फेम मिळालं आणि स्वतःला महान समजायला लागला. त्याला वाटलं ऑनलाइन फॅन त्याचे चित्रपट बघतील, शोचा टीआरपी वाढवतील पण प्रत्यक्षात वेगळंच होताना दिसत आहे. पुढे पण दिसत राहणार. एका पॉइंटला सगळं हातातून जाणार. चांगला अभिनेता होता म्हणून काय ते वाईट वाटतं असे थुकरट विनोद मारताना बघून, भोजनेचं पण तसंच झालं. नशिबात जे लिहिलंय ते होणारच”. नेटकऱ्याच्या या कमेंटवर गौरवने प्रतिउत्तर देत असं म्हटलं आहे की, “आधी स्वतःच्या अकाउंटवरून बोला, मग आमच्याबद्दल बोला, बाकी गरमी एन्जॉय करा”.

आणखी वाचा – ‘घरोघरी…’ फेम जानकी-ऐश्वर्याची जुगलबंदी पाहून प्रेक्षकांनाही हसू आवरेना, पुण्यात थाटामाटात पार पडलं महाकेळवण, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

गौरवच्या उत्तरावर तो नेटकरी कमेंट करत त्याला आणखी ट्रोल करु लागला. नेटकरी पुन्हा कमेंट करत बोलला, “मग हे अकाउंट कोणाचं आहे?, स्वतःच्या अकाउंटने म्हणजे नक्की काय असतं?. स्वतःचं नाव मेंशन असलेलं अकाउंट? म्हणजे नाव बघून रिप्लाय देणार की खरा फोटो बघून त्यावर कमेंट करणार?”, असं म्हटलं आहे. या संभाषणात गौरवची त्याच्या चाहत्यांनी बाजू घेतली. त्यावर तो नेटकरी म्हणाला, “अरे लेका, तू नक्की कोणाच्या बाजूने बोलत आहे? माझ्या की महाराज गौरवादित्य? मराठी माझं चांगलं आहे असं म्हणतोस आणि तू स्वतःचं हिंदीत बोलत आहेस. मग मी जज करणारच ना. जर हा मराठीपेक्षा हिंदीला महत्त्व देत असेल तर बच्ची बच्ची वाला फिल्टरपाड्याचा गुंड”.

आणखी वाचा – हार्दिक जोशीने बायकोच्या वाढदिवसाचं केलं जंगी सेलिब्रेशन, अक्षया ३० वर्षांची होताच खास केकही आणला अन्…; फोटो व्हायरल

नेटकऱ्याने फिल्टरपाड्याचा गुंड असं म्हणताच गौरवचा पारा चढला. गौरव नेटकऱ्याला सुनावताना म्हणाला, “अहो फुकट कमेंट आहे म्हणून काहीही बोलायचं नसतं. घरी पण स्वतःच्या कुटुंबाबरोबर असंच बोलता का? स्वतःचा फोटो ठेवायला हिंमत लागते जी आपल्यात नाही आहे. राहिला प्रश्न गुंडाचा तर कधी वेळ मिळाला तर चक्कर मारा फिल्टरपाड्याला. सगळे समज-गैरसमज दूर होतील आणि हो स्वतःचा फोटो लावून बड्या बड्या बाता मारा कळलं का?”. गौरवच्या या उत्तरानंतरही तो नेटकरी शांत राहिला नाही. आणि कमेंट करत गौरवला सुनावू लागला.

Tags: gaurav moreGaurav More Angry On Netizengaurav more trollmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Titeeksha Tawde and Siddharth Bodke shared a special video of their first road trip

Video : खोल दरी, निसर्गरम्य वातावरण अन्...;  तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके पहिल्या रोड ट्रीपचा लुटतायत आनंद, मॅगी आणि कोल्ड कॉफीही बनवली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.