रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण? चित्रपटासाठी ‘या’ अभिनेत्रीही घेतात ‘इतकी’ रक्कम

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 13, 2024 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Highest Paid Actress

बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण? चित्रपटासाठी 'या' अभिनेत्रीही घेतात 'इतकी' रक्कम

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्री अशा आहेत ज्या त्यांच्या कामामुळे ओळखल्या जातात. मात्र या अभिनेत्री बॉलीवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री आहेत, ज्या चांगले काम करण्यासोबरोबरच भरमसाठ फीदेखील घेतात. काहींची फी १० कोटी रुपये आहे तर काहींची फी २० कोटींहून अधिक आहे. अभिनेत्री कंगना रणौत सध्या राजकारणात सक्रिय असली तरी तिचा आगामी चित्रपट म्हणजे आणीबाणी हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना रणौत एका चित्रपटासाठी १० ते १२ कोटी रुपये मानधन घेते. (Highest Paid Actress)

कतरिना कैफचा शेवटचा चित्रपट फ्लॉप ठरला पण तरीही तिला इंडस्ट्रीत खूप मागणी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना एका चित्रपटासाठी १५ ते २० कोटी रुपये घेते. श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट ‘स्त्री २’ लवकरच येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूर एका चित्रपटासाठी १० ते १५ कोटी रुपये घेते. ‘क्रू’च्या यशानंतर इंडस्ट्रीमध्ये करीना कपूरची मागणीही वाढली आहे. करिनाचा पुढचा चित्रपट ‘सिंघम अगेन’ हा या वर्षी प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिना एका चित्रपटासाठी ८ ते १० कोटी रुपये घेते.

आणखी वाचा – “त्याने प्रिती झिंटाला डेट केलं होतं पण…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा नवऱ्याबाबत खुलासा, म्हणाली, “त्या दोघांमध्ये…”

‘गंगूबाई काठियावाडी’सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या टॉप अभिनेत्रींपैकी आलिया एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट एका चित्रपटासाठी १२ ते १५ कोटी रुपये घेते. ‘पठाण’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटात दिसलेली दीपिका पदुकोण आता ‘सिंघम अगेन’ आणि ‘कल्की 2898 एडी’ सारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोण एका चित्रपटासाठी २० ते ३० कोटी रुपये घेते.

आणखी वाचा – Video : खोल दरी, निसर्गरम्य वातावरण अन…; तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके पहिल्या रोड ट्रीपचा लुटतायत आनंद, मॅगी आणि कोल्ड कॉफीही बनवली

देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली प्रियांका चोप्रा अनेक वर्षांपासून कोणत्याही हिंदी चित्रपटात दिसली नाही. पण येत्या काळात ती काही चित्रपटांमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. प्रियांका सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे जी एका चित्रपटासाठी ४० कोटी रुपये मानधन घेते.

Tags: bollywood actressbollywood industryentertainmentHighest Paid Actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
14 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मकर व कुंभ राशीसह ‘या’ राशींना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता,तर काहींना नोकरीत मिळणार बढती, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.