रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याने प्रिती झिंटाला डेट केलं होतं पण…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा नवऱ्याबाबत खुलासा, म्हणाली, “त्या दोघांमध्ये…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 13, 2024 | 4:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
suchitra pillai on preity zinta

"त्याने प्रिती झिंटाला डेट केलं होतं पण…", सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा नवऱ्याबाबत खुलासा, म्हणाली, "त्या दोघांमध्ये…"

प्रीती झिंटा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. १९९८ साली तिने ‘दिल से’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. चित्रपटांबरोबर ती वैयक्तिक आयुष्यातदेखील खूप चर्चेत राहिली आहे. तिच्या अफेअर्सच्या चर्चादेखील त्या काळी खूप रंगल्या होत्या. सध्या ती तिच्या एका रिलेशनशिपमुळे अधिक चर्चेत आली आहे. याबद्दल अभिनेत्री सूचित्रा पिल्लईने काही खुलसे केले आहेत. ज्यामुळे प्रीती व सूचित्रा पिल्लई यांच्यामधील अबोल्याचे कारण समोर आले आहे. (suchitra pillai on preity zinta)

 प्रीती व सुचित्रा या दोघीही ‘दिल चाहता है’ या चित्रपटामध्ये एकत्र काम करताना दिसून आल्या होत्या. या चित्रपटामध्ये सुचित्रा सैफ अली खानच्या प्रेयसीची भूमिका केली होती. तसेच नंतर काही मालिका व चित्रपटांमध्येही दिसून आली होती. ती नुकतीच जयदीप अहलावत व सोनाली बेंद्रे यांच्याबरोबर ‘ब्रोकन न्यूज २’ मध्ये दिसून आली होती. नुकताच तिने एका मुलाखतीमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासे केले. तिच्यावर नेहमी प्रीतीचा बॉयफ्रेंड हिरावून घेण्याचा आरोप केला जात होता. त्याबद्दल आता तिने दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.

आणखी वाचा – मतदार यादीतून नाव गायब झाल्याने सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला कारण…”

View this post on Instagram

A post shared by Suchitra Pillai (@suchipillai)

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, “माझे पती लार्स केजेल्डसन आधी प्रीतीला डेट करत होते. पण त्यांच्या ब्रेकअपचे कारण मी नव्हते. तसेच मी व प्रीती कधीही एकमेकींच्या मैत्रिणी नव्हतो. पण लार्स आधी प्रीतीला डेट करत होते. त्यांचे नाते काही काळच टिकले. मी त्याला भेटायच्या आधीच त्यांचा ब्रेकअप झाला होता. त्यामुळे मी त्यांच्यामध्ये येण्याचा काहीही संबंध नाही. ते दोघेही त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे वेगळे झाले होते”.

आणखी वाचा – आयटम सॉंगमुळे हिट झालेली ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, सध्या जगतेय असं आयुष्य

सुचित्राने प्रीतीचा एक्स बॉयफ्रेंड लार्सबरोबर २००५ साली लग्न केले. त्यांना एक अन्निका नावाची मुलगीदेखील आहे. तसेच प्रीती २०१६ साली जीन गुडइनफबरोबर लग्न केले व २०२१ साली सरोगसीद्वारे तिने जुळ्या मुलांची आई झाली. मुलांचा चेहरा अद्याप प्रीतीने जगासमोर येऊ दिला नाही.  

Tags: bollywoodPreity Zintasuchitra pillai
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Highest Paid Actress

बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण? चित्रपटासाठी 'या' अभिनेत्रीही घेतात 'इतकी' रक्कम

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.