शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१३व्या वर्षी घर सोडलं, मुंबईत येऊन बनले गुंड अन्…; अजय देवगणने सांगितली वडिलांच्या संघर्षाची कहाणी, म्हणाला, “रस्त्यावर भांडताना त्यांना…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 22, 2023 | 10:24 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ajay Devgn On Father

१३व्या वर्षी घर सोडलं, मुंबईत येऊन बनले गुंड अन्…; अजय देवगणने सांगितली वडिलांच्या संघर्षाची कहाणी, म्हणाला, "रस्त्यावर भांडताना त्यांना…"

अजय देवगण व रोहित शेट्टी यांनी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ८’ च्या भागात हजेरी लावली होती. या शोमधील त्यांची मुलाखत सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे. अजय देवगण याने त्याचे वडील दिवंगत आक्षण डायरेक्टर वीरू देवगण यांच्याबद्दल केलेलं भाष्य सध्या चर्चेत आलं आहे. या शोमध्ये बोलताना अजयने सांगितले की, “वडिलांनी वयाच्या १३व्या वर्षी घर सोडले आणि ते रस्त्यावर मारामारी करणाऱ्या गँगचे सदस्य बनले”. (Ajay Devgn On Father)

‘कॉफी विथ करण ८’मध्ये करणने अजयला विचारले की, “तुझ्या वडिलांचे योग्य कौतुक झाले आहे का?” यावर अजय म्हणाला, “हो. माझे वडील १३ वर्षांचे असताना पंजाबमधील घरातून पळून गेले होते. रेल्वेचे तिकीट न घेता त्यांनी मुंबई गाठली होती. त्यासाठी त्यांना ताब्यातही घेण्यात आलं होतं. त्यांच्याकडे काम नव्हतं आणि खायला अन्नही नव्हतं. पण कोणीतरी त्यांना मदत केली आणि सांगितलं की जर त्यांनी गाडी धुवून दिली तर ते त्या कारमध्ये झोपू शकतात. तिथून त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. यानंतर वीरू सुतार बनले आणि त्यानंतर ते गुंड बनले. एका टोळीचा ते भाग होते. ते त्या टोळीकडून लोकांशी भांडायचे”.

आणखी वाचा – शाहरुख खानचा ‘डंकी’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी, रेकॉर्डब्रेक कमाई करणार, एका दिवसातच कमावले तब्बल…

जेव्हा अजयने शोमध्ये हे सर्व सांगितले तेव्हा करणने अतिशय धक्कादायक प्रतिक्रिया दिली. अजय पुढे म्हणाला,”एक दिवस सिनियर ऍक्शन डायरेक्टर रवी खन्ना यांनी त्यांना स्ट्रीट फाईट करताना पाहिले. त्याने गाडी थांबवली आणि वडिलांना विचारले, तुम्ही काय करता? पप्पा म्हणाले, ‘मी सुतार आहे’. खन्ना म्हणाले की, “तू खूप चांगला भांडतोस, उद्या मला भेटायला ये”. अशा प्रकारे माझे वडील त्यांचे सहाय्यक बनले आणि त्या नंतर बॉलिवूडचे प्रसिद्ध ऍक्शन डायरेक्टर म्हणून प्रसिद्ध झाले.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

आणखी वाचा – “ब्रेकअपच लपवून ठेवलं अन्…”, सुशांत सिंग राजपूतबद्दल पुन्हा एकदा बोलली अंकिता लोखंडे, म्हणाली, “आमचं सात वर्षांचं नातं…”

या एपिसोडमध्ये अजयसह उपस्थित असलेला दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाला की, त्याच्या वडिलांची गोष्टही जवळपास सारखीच आहे. रोहितने सांगितले की, “त्याचे वडीलही वयाच्या १३ व्या वर्षी मुंबईत आले आणि येथे आल्यानंतर त्यांनी रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी बॉडी बिल्डिंगचे धडे घेतले. त्यांची उंची पाहून एका वरिष्ठ ऍक्शन डायरेक्टरने त्याला कामावर घेतले. रोहितचे वडील दिवंगत एमबी शेट्टी हे देखील ऍक्शन डायरेक्टर म्हणून लोकप्रिय होते.

Tags: ajay devgnajay devgn on fatherbollywood actoebollywood movieentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar shared special post on instagram

"माझा हा पहिलाच पुरस्कार पण…", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकरची इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट, म्हणाली, "हा क्षण गमावल्याबद्दल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.