‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच या वाहिनीवरील एका मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ती मालिका म्हणजे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’. या मालिकेने तिच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. रहस्यमय मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिकेच्या कथानकात उलगडणारे हे रहस्य साऱ्यांची उत्सुकता वाढवत आहेत. अशातच आता मालिकेत आणखी एक वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. (Satvya Mulichi Satvi Mulagi Promo)
नुकताच मालिकेत अस्तिकाचा अंत झाल्याचा ट्विस्ट आला आहे. अस्तिका अद्वैतला मारायचा प्रयत्न करत असताना नेत्रामध्ये येते व अद्वैतचा जीव वाचवते आणि अस्तिकावर एका धारदार शस्त्राने हल्ला करत ती अस्तिकाचा अंत करते. यानंतर विरोचकही अद्वैतला मारत असताना नेत्रा विरोचकाचाही अंत करत असल्याचे पाहायला मिळालं. मात्र नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये विरोचक पुन्हा जिवंत झालं असल्याचं समोर आलं आहे. विरोचकला अमरण हे वरदान प्राप्त झालं.
मालिकेत विरोचक पुन्हा जिवंत झाली आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये रुपाली शेखरला असं सांगताना दिसत आहे की, “तुझ्या नेत्राकडे त्रिनयनीचं वरदान आहे. आणि माझ्याकडे अमरत्वाचं वरदान आहे. सर्वश्रेष्ठ वरदान. कधीच त्यांचा अंत होणार नाही. या सगळ्याचा अर्थ असा आहे की, या युद्धात हा विरोचकचं जिंकणार”. तर मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे.
या प्रोमोमध्ये, नेत्रा व अद्वैत एकत्र बसलेले दिसत आहेत. तेव्हा ती देवी आईला सांगत असते की, “माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी चालेल. पण माझ्या कुंकवाला धक्का लागू देऊ नकोस. असं काही झालं तर माझा तुझ्यावरचा विश्वास उडेल”, आता विरोचक नेत्रा व अद्वैतच्या जीवाशी काही बरं वाईट करणार का?, की त्रिनयना देवी विरोचकाचा वध करणार हे मालिकेत पाहणं रंजक ठरेल.