रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अधिपतीला शिकवायला नव्या मास्तरीणबाई, नवऱ्याच्या आयुष्यात नव्या व्यक्तीला पाहून अक्षरा नाराज, कोण आहे ही नवी अभिनेत्री?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 30, 2024 | 2:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changalach Dhada Promo

अधिपतीला शिकवायला नव्या मास्तरीणबाई, नवऱ्याच्या आयुष्यात नव्या व्यक्तीला पाहून अक्षरा नाराज, कोण आहे ही नवी अभिनेत्री?

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. मालिकेत अक्षरा-अधिपतीच्या जोडीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. सध्या मालिकेत अक्षरा व भुवनेश्वरी यांच्यातील वाद कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी भुवनेश्वरीच्या मनात अक्षराबद्दल राग हा असतोच. त्यामुळे भुवनेश्वरी अगदी योग्य अशी चाल खेळत अक्षराला धडा शिकवायचं ठरवतात. अशातच नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये भुवनेश्वरीने खेळलेली चाल पाहायला मिळत आहे. आणि यामुळे अक्षराचा हिरमोड झाला असल्याचंही पाहायला मिळत आहे. (Tula Shikvin Changalach Dhada Promo)

अधिपतीला गाणं गायचं असतं. मात्र गाणं गाण्याची परवानगी अधिपतीला नसते. त्यामुळे भुवनेश्वरीकडून अधिपतीला त्याची आवड जोपासता यावी म्हणून गाणं गाण्यासाठी परवानगी घ्यायला अक्षरा व चारुहास जातात. चारुहास भुवनेश्वरीला म्हणतात, “अधिपतीच्या गळ्यात गाणं आहे, सूर आहे. आणि मी ते ऐकलं आहे. त्यामुळे त्याने गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे”, असं म्हणतात. यावर भुवनेश्वरी म्हणतात, “हा माझ्या लक्षात येतंय तुमच्या दोघांचं म्हणणं काय आहे ते. आम्ही विचार करतो”, असं ती म्हणते.

आणखी वाचा – ठरलं तर मग! सायली, अर्जुन व चैतन्य मिळून साक्षीला शिकवणार धडा, नवा डाव आखत अद्दल घडवणार अन्…

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

त्यांनतर आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये, भुवनेश्वरी अधिपतीला गाण्याची शिकवणी देण्याचं ठरवतात. आणि त्याच स्वतः शिक्षिका शोधतात. अभिनेत्री सानिया चौधरीची मालिकेत एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. भुवनेश्वरी म्हणतात, “आजपासून तुमच्या गाण्याची शिकवणी सुरु”. यावर अक्षरा विचारते, “अधिपतींना कोण शिकवणार?”. यावर भूवनेश्वरी शिक्षिकेकडे बोट दाखवत सांगतात, “यांच्या नावातच गाणं आहे. सरगम. यांचा एकदम चांगला गळा आहे. रेडिओवर पण गातात. यांचे गाण्यांचे कार्यक्रम होतात. टीव्हीवरपण आल्या होत्या”. यावर अधिपती खुश होऊन, “एक नंबर आहेत मास्तरीणबाई”, असं म्हणतो. यावर अक्षराला धक्का बसतो. अक्षरा मास्तरीणबाई असं म्हणून त्याच्याकडे पाहते. यावर अधिपती, “अहो आता या गाणं शिकवणार म्हणजे मास्तरीणबाई या अर्थाने बोललो”, असं तो म्हणतो.

आणखी वाचा – पारूच्या डोळ्यांचं रहस्य नेमकं आहे तरी काय?, तिच्याच डोळ्यांमध्ये हरवून गेला आदित्य, किर्लोस्करांच्या घरात नवं स्थान मिळणार का?

नवीन मास्तरीणबाई अधिपतीच्या आयुष्यात आल्याने अक्षराचा चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. तर भुवनेश्वरीने अक्षराला धडा शिकवण्यासाठी ही चाल आखत नव्या मास्तरीणबाईला आणलेलं असतं, आता मालिकेत या नव्या पात्रामुळे काय ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: marathi serialTula shikvin Changalach DhadaTula Shikvin Changalach Dhada Promozee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
actor gurucharan singh

दारुच्या नशेमध्ये गोंधळ, घर सोडण्याचीही आली होती वेळ, 'तारक मेहता…'मधल्या रोशनने गोकुळधाम सोसायटीमध्ये घातला होता राडा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.