सोमवार, मे 19, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बारावीत नापास झाला अन्…; चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारताना सुबोध भावेला आठवला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “माझ्या मातोश्री रडतील कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 17, 2024 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Subodh Bhave Funny Post

बारावीत नापास झाला अन्…; चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारताना सुबोध भावेला आठवला 'तो' प्रसंग, म्हणाला, "माझ्या मातोश्री रडतील कारण..."

मराठमोळा अभिनेता सुबोध भावे याने आजवर मराठी मालिका, चित्रपट, वेबसीरिज, नाटक या माध्यमातून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आपल्या अभिनयाच्या जोरावर सुबोधने सिनेसृष्टीत स्वतःच असं स्थान निर्माण केलं. सुबोध नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सुबोधच्या अभिनयाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत सुबोधचं नाव आवर्जून घेतलं जात. (Subodh Bhave Funny Post)

अलीकडेच सुबोध त्यांच्या ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. याशिवाय त्याच्या आगामी ‘संगीत मानापमान’ या संगीतमय चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. याशिवाय काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटालाही सुबोधने आवाज दिला. सुबोध एकामागोमाग येणाऱ्या त्याच्या चित्रपटांमुळे भरपूर व्यस्त असल्याचं पाहायला मिळतं. अशातच सुबोधने शेअर केलेल्या एका गमतीशीर पोस्टने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – किर्लोस्करांनी घेतली पारूच्या लग्नाची जबाबदारी, अहिल्यादेवींचा मोठा आधार, प्रीतम-दिशाच्या साखरपुड्याची धामधूम सुरु

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

सुबोध सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच सुबोधने शेअर केलेल्या एका गमतीशीर इंस्टाग्राम पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सुबोधने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तो काही मुलांना शिकवताना दिसत आहेत. या मुलांना तो भौतिकशास्त्राचे ज्ञान देताना दिसत आहे.

आणखी वाचा – बायकोकडून लाड करुन घेत आहे प्रथमेश परब, क्षितिजाने केली डोक्याला तेल मालिश अन्…; म्हणाला, “लग्नानंतरचं…”

हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे की, “बारावी बोर्ड परीक्षेत आम्ही मोठ्या मनाने व मोठ्या मार्काने physics या विषयात नापास झालो. आणि आज एका चित्रपटात मी physicsच्या प्राध्यापकाची भूमिका करताना विद्यार्थ्यांंना घडवत आहे. अशीच शिक्षा पाहिजे physicsला. आमच्या मातोश्री यांना हा चित्रपट दाखवल्यावर त्या गदागदा रडतील”, असं म्हटलं आहे, त्याने यापुढे #बदला #extraordinaryrevenge व #karma असे हॅशटॅगही वापरले आहेत. ‘अशीच शिक्षा पाहिजे फिजिक्सला’ या त्याच्या वाक्यावर अनेकांना हसू आलं आहे. अनेक कलाकारांनीही या पोस्टवर कमेंट करत हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Tags: entertainmentmarathi actorsubodh bhaveSubodh Bhave Funny Post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
Satvya Mulichi Satvi Mulagi Promo

नेत्राने वध केल्यानंतर विरोचक पुन्हा जिवंत, अमर असल्याचं वरदान, युद्धात पहिला मृत्यू अद्वैतचा होणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.