रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : दुबईमध्ये पावसाचं थैमान, पूरामध्ये अडकला गायक राहुल वैद्य, हातात शूज घेऊन पाण्यामधून चालत बाहेर पडला अन्…; व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 17, 2024 | 12:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rahul Vaidya At Dubai

Video : दुबईमध्ये पावसाचं थैमान, पूरामध्ये अडकला गायक राहुल वैद्य, हातात शूज घेऊन पाण्यामधून चालत बाहेर पडला अन्...; व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस’ फेम व गायक राहुल वैद्य नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरही राहुल बऱ्यापैकी सक्रिय असतो. सध्या राहुल त्याची पत्नी दिशा परमार आणि मुलगी नव्या यांच्याबरोबर दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचं समोर आलं आहे. दुबई येथे फिरतानाचे अनेक फोटो व व्हिडीओ राहुलने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. दरम्यान, दुबईत काहीसा पाऊस झाल्याने तेथील परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याची माहिती राहुलने दुबई येथून दिली आहे. (Rahul Vaidya At Dubai)

राहुल वैद्य त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सतत फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. राहुलने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दुबईच्या रस्त्यावर भरलेल्या पाण्यातून रस्ता ओलांडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राहुलने चपला हातात धरलेल्या दिसत आहेत. आणि त्याची पँटवर करुन तो पाण्यातून वाट काढताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. वाहनेही पाण्यात उभी असलेली दिसत आहेत. राहुलकडे बघून त्याने पाण्याने भरलेला रस्ता मोठ्या कष्टाने पार केल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा – नेत्राने वध केल्यानंतर विरोचक पुन्हा जिवंत, अमर असल्याचं वरदान, युद्धात पहिला मृत्यू अद्वैतचा होणार का?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दुबईमध्ये अवघ्या ३-४ तासांच्या पावसामुळे ही परिस्थिती झाल्याचे राहुलने सोशल मीडियाद्वारे सांगितलं. या स्टोरीमध्ये तो कारमध्ये बसलेला दिसत आहे. गाडीत बसून राहुल बाहेरचे दृश्य दाखवत आहे. अवघ्या ३-४ तासांच्या पावसाने दुबईची अशी वाईट अवस्था झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. व्हिडीओमध्ये राहुल सांगतो की, “दुबईच्या लोकांना अशा पावसाची सवय नाही. २००८मध्ये असा पाऊस पडला होता आणि आता इतक्या वर्षांनी एवढा पाऊस पडला आहे असे मला कोणीतरी सांगितले. सर्व वाहनेही पाण्यात बुडाली आहेत”.

आणखी वाचा – बारावीत नापास झाला अन्…; चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारताना सुबोध भावेला आठवला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “माझ्या मातोश्री रडतील कारण…”

राहुल वैद्यने टीव्ही अभिनेत्री दिशा परमारसह लग्नगाठ बांधली. लग्नाच्या २ वर्षांनंतर या जोडप्याने त्यांनी गोंडस अशा मुलीला जन्म दिला. नव्या असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच या जोडप्याने त्यांच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला. सोशल मीडियावर ते लेकीबरोबरचे अनेक व्हिडीओ व फोटो पोस्ट करत असतात. राहुल व दिशा पहिल्यांदाच त्यांच्या लेकीसह परदेशात फिरायला गेले आहेत.

Tags: entertainmentRahul Vaidya At Dubairahul vaidya familyrahul vaidya stuck in dubai rainfall
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
nach ga ghuma trailer launch

नम्रता संभेराव-मुक्ता बर्वेची जुगलबंदी, मायराची झलक, कामवाली बाई अन्…; 'नाच गं घुमा'चा धमाकेदार ट्रेलर, प्रेक्षकांची भरभरुन पसंती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.