बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सिगारेट ओढणारच आणि…”, कॅन्सरनंतर डॉक्टरांनी ओरडूनही ऐकले नाहीत महेश मांजरेकर, म्हणाले, “मरणार नसल्याची शाश्वती द्या तरच…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 30, 2024 | 1:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mahesh Manjrekar said that he likes and he loves to smoke cigarettes

"सिगारेट ओढणारच आणि…", कॅन्सरनंतर डॉक्टरांनी ओरडूनही ऐकले नाहीत महेश मांजरेकर, म्हणाले, "मरणार नसल्याची शाश्वती द्या तरच…"

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते महेश मांजरेकर यांना २०२१ मध्ये कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांनी अत्यंत धीरानं या कॅन्सरशी लढा दिला आणि त्यावर मात केली. महेश मांजरेकर यांना ब्लॅडर कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यांचा हा लढा अनेकांसाठी प्रेरणादायी होता. त्यांनंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आता महेश मांजेरकर ‘कॅन्सरमुक्त’ आहेत. मात्र, या आजारपणातही त्यांनी एका शोचे शूटिंग केले होते.

दिग्दर्शक महेश मांजेरकर यांना जेव्हा कॅन्सर झाला त्यावेळी ते ‘बिग बॉस’ चा शो करत होते. मांजरेकरांनी बिग बॉसचा अख्खा प्रोमो कॅन्सरच्या सर्जरीनंतर केला आहे. त्यावेळी त्यांनी लघवीची पिशवी, वेगवेगळ्या ट्यूब लावून हा प्रोमो शूट केला. याबद्दल बोलताना त्यांनी असं म्हटलं की, तुम्ही मनाने जर स्ट्रॉंग असाल तर तुम्हाला कोणत्याच आजाराची भीती वाटत नाही.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

सामान्यत; कॅन्सर हा धूम्रपाणामुळे होतो असा समज आहे. पण महेश मांजरेकरांनी त्यांना कॅन्सर व्हायच्या आधीच साडेदहा वर्षे धूम्रपान करणे सोडले होते. तरीदेखील कालांतराने त्यांना कॅन्सर झाला. याबद्दल त्यांनी नुकत्याच ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. या काळात त्यांनी काही पथ्य पाळली होती का? असा प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल त्यांनी काहीच पथ्ये पाळली नसल्याचे म्हटले.

आणखी वाचा – नेत्रा व इंद्राणी विरोचकाविरोधात कोणता नवा डाव आखणार?, फाल्गुनीची अवस्था पाहून तेजसचे रडून हाल, त्रिनयना देवीचा चमत्कार होणार का?

याबद्दल ते असं म्हणाले की, “मला सिगारेट आवडते म्हणून मी ती पुन्हा सुरु केली. यामुळे मी माझे डॉक्टर माझ्यावर चिडले. ते मला म्हणाले की, “पागल झाला आहेस का?, तुला कॅन्सर होण्याचे हेच एकमेव कारण आहे”. यावर मांजरेकरांनी असं म्हटलं की, “मला कॅन्सर झाला त्याच्या साडेदहा वर्षे आधी मी सिगारेट सोडली होती, पण तरीदेखील मला कॅन्सर झालाच ना… and I love to smoke. हे कुणीही करू नये, हे आरोग्यासाठी खूपच घातक आहे. पण मला सवय आहे. त्याला आता काय करणार?”

आणखी वाचा – “साईराजशी बोलतही नाही कारण…”; ‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अर्जुनचं स्पष्ट मत, म्हणाला “त्याच्यापासून लांब राहतो आणि…”

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मी डॉक्टरांना असं म्हटलं की, डॉक्टर तुम्ही मला शाश्वती द्या की, मी जर सिगारेट पिणे सोडलं तर मी कधीच मरणार नाही. हे चूक आहे मान्य आहे. पण मी त्याबद्दल मी ओके आहे आणि मी दर सहा महिन्यांनी टेस्ट करतो आणि ती करायला लागतेच. त्याला काहीच पर्याय नाही.”          

Tags: mahesh manjrekarmarathi directormarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Hemangi Kavi replied who made negative comments on the her dance reel

"विकृत चाळे, प्रसिद्धीची भूक", डान्स व्हिडीओवरुन हिणावल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, "लांडगेदादा आम्हाला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.