मराठी मनोरंजनविश्वातील सर्वगुण संपन्न अभिनेता म्हणून संकर्षण कऱ्हाडेला ओळखलं जातं. संकर्षणने त्याच्या कारकिर्दीत नाटक, मालिका व चित्रपट या तीनही माध्यमांतून दमदार अभिनय साकारत प्रेक्षकांना आपलंसं केलं. संकर्षण केवळ अभिनेता नाही, तर एक उत्तम निवेदक, कवी, लेखक आणि दिग्दर्शक सुद्धा आहे. संकर्षण सध्या अनेक नाटकांच्या प्रयोगासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये दौरे करतो. त्याच्या दौऱ्यांना प्रेक्षकांचा नेहमीच प्रतिसाद मिळत असून त्याची ही क्रेझ देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. संकर्षण ‘नियम व अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘संकर्षण Via स्पृहा’ अशी नाटक करत आहे. त्यातील ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे प्रयोग विदेशात यशस्वीरीत्या पार पडत आहे. (Sankarshan Karhade ‘niyam va ati lagu’ abu dhabi tour)
संकर्षण त्याच्या ‘नियम व अटी लागू’ नाटकाची संपूर्ण टीमसह अमेरिकेनंतर नुकतीच संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे पोहोचली. युएईतील अबुधाबी येथे त्याच्या नाटकाचा प्रयोग नुकताच यशस्वीरीत्या पार पडला. या प्रयोगाच्या काही क्षणांचा एक व्हिडीओ नुकताच त्याने सोशल मीडियावर शेअर केला.
हे देखील वाचा – ‘केबीसी’च्या मंचावरुन अमिताभ बच्चन यांनी थेट प्राजक्ता माळीला केला व्हिडीओ कॉल, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्या आयुष्यातील…”
संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘नियम व अटी लागू’च्या अबुधाबी दौऱ्यातील एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्याला कॅप्शन देत म्हटलं, “अबुधाबी प्रयोग हाऊसफुल्ल” दिवाळीची सुरवात धुमधडाक्यात झाली. धन्यवाद मराठी रसिक प्रेक्षकांनो, पून्हा भेटू! रात्री मुंबईत परतणार!”. तर या व्हिडिओमध्ये नाटकांच्या प्रयोगाला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी प्रेक्षक नाटकाच्या टीमचं स्वागत करताना दिसत आहे. तसेच या नाटकाचे काही फोटोजदेखील शेअर करण्यात आले. ज्यात नाटकाचे कलाकार अमृता देशमुख, प्रसाद बर्वे देखील दिसत आहे. अबुधाबी दौऱ्यातील हे फोटोज व व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते कलाकारांवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
हे देखील वाचा – नाटकाचा प्रयोग, मिसकॅरेज झालं अन्…; मराठी अभिनेत्री सुरभी भावेने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली, “गर्भ काढून टाकलं आणि…”

दरम्यान, अबुधाबी येतील प्रयोगापूर्वी संकर्षणने काल बोरिवलीचा प्रयोग केला. त्याची एक पोस्ट देखील त्याने इंस्टाग्रामवर शेअर केली होती. आता अबूधाबीतील प्रयोगानंतर तो राज्यभरात त्याच्या विविध नाटकांचे प्रयोग पार पडणार आहे. तसेच, तो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटातही पाहायला मिळाला होता.