सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चैतन्यने पुन्हा केला अर्जुनचा विश्वासघात, तर प्रियाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर आणलं, सायलीने प्रेमाची कबुली देत डाव पलटला अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 6, 2024 | 10:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Mag Serial Update

चैतन्यने पुन्हा केला अर्जुनचा विश्वासघात, तर प्रियाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर आणलं, सायलीने प्रेमाची कबुली देत डाव पलटला अन्…

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, चैतन्य व अर्जुन यांच्यातील वाद मिटलेला असतो आणि त्यानंतर चैतन्य अर्जुनला त्याच्या ऑफिसमध्ये भेटायला आलेला असतो. त्यावेळेला खूप दिवसांनी आल्यामुळे चैतन्यला खूपच आनंदी वाटत असतं तर अर्जुनही चैतन्यला मिस करत असतो. त्यानंतर अर्जुन चैतन्यला सांगतो की, मला तुला काहीतरी गोष्ट सांगायची आहे, असं म्हणत तो सायली वर त्याचं किती प्रेम आहे आणि सायलीच्या तो प्रेमात पडला असल्याचं चैतन्यसमोर कबूल करतो. (Tharal Tar Mag Serial Update)

तेवढ्यात चैतन्यच्या लक्षात येत की, आपण तर रागाच्या भरात सायली व अर्जुनच्या या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल साक्षीला सांगून बसलोय. आता जर मी हे अर्जुनला सांगितलं तर त्याचा पुन्हा विश्वासघात होईल असं म्हणून तो विचार करू लागतो. तर इकडे साक्षी प्रियाला सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सगळं काही खरं सांगते. ते ऐकून प्रियाचा आनंद गगनात मावेनासा होतो. तिला सुरुवातीला विश्वासच बसत नसतो मात्र नंतर ती विश्वास ठेवते आणि सांगते की, आत्ताच्या आत्ता मी जाऊन हे सगळं काही योग्य अशा व्यक्तीला सांगते असं म्हणत ती सुभेदारांच्या घरी निघते.

आणखी वाचा – नव्या नवरीच्या मनात गैरसमज निर्माण करतेय संजना, आरोहीसमोरच अरुंधतीने घेतली शाळा, असुरी आनंद मोडून काढला अन्…

View this post on Instagram

A post shared by ठरलं तर मग..!!???? (@tharlatarmag_official)

तर इकडे साक्षी व चैतन्य जेव्हा भेटतात तेव्हा चैतन्य साक्षीला विचारतो की मी तुला अर्जुन व सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल सांगितलं होतं तू कोणाला सांगितलं नाहीस ना उगीच कोणाला सांगून विश्वासघात हा थप्पा लागायला नको म्हणून मी तुला विचारतोय तेव्हा साक्षीला थोडासा डाऊट येतो की अचानक आता चैतन्य असं का विचारत आहे. त्यानंतर इकडे पूर्णा आजीला साक्षी सगळं काही खरं सांगते. त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्यांनी एकमेकांच्या फायद्यासाठी हे लग्न केलं आहे पण यात अर्जुनचा नेमका स्वार्थ काय हेच मला कळालेलं नाही. मला ही गोष्ट चैतन्यने सांगितली. तेव्हा पूर्णा आजी विचार करू लागते आणि सांगते की, तू जे बोलत आहे ते सगळं काही सत्य असेल तर मी आत्ताच्या आत्ता सायलीला या घराबाहेर काढेन असं म्हणत पूर्णा आजी खाली येतात आणि सायलीला म्हणतात की, अजून किती दिवस या घराभोवती विळखा घालून बसणार आहेस. त्यावर सायली म्हणते, आता मी काय केलं यावर पूर्णा आजी सायलीच्या हाताला धरतात आणि सांगतात की, आज मी तुझा गुन्हा सिद्धच करून दाखवते आणि असं म्हणत तिला देवघरात घेऊन जातात आणि देवावर हात ठेवून शपथ घ्यायला लावतात की, अर्जुन आणि तिचं हे प्रेम खरं आहे आणि त्यांनी खरंच लग्न केलं आहे. यावर सायली शपथ घेत सांगते की, हो माझं आणि यांचं लग्न झालं आहे आणि माझे यांच्यावर भरपूर प्रेम आहे.

आणखी वाचा – राहा कपूर काका अयान मुखर्जीबरोबर फिरताना दिसली अन्…; रणबीर-आलियाच्या मुलीचे Cute Expression पाहून व्हाल थक्क, व्हिडीओ व्हायरल

हे पाठीमागे उभा राहून अर्जुनही ऐकत असतो आणि सायली पटकन बोलून जाते. आता सायलीने तर प्रेमाची कबुली दिलेली असते. मात्र हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सिद्ध करण्यासाठी आता साक्षी व प्रिया काही डाव तर आखणार नाही ना?, हे सर्व पाहणे मालिकेत रंजक ठरेल.

Tags: entertainmentmarathi serialstar pravahtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Prasad Khandekar Birthday Party

Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमला प्रसाद खांडेकरने दिली बर्थडे पार्टी, सेटवरच लावला पाणीपुरीचा स्टॉल, खायला गर्दी अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.