सध्या मराठी सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु झालेली पाहायला मिळतेय. कलाकारांची लग्नासाठीची धामधूम सुरु झाली आहे. तसेच एकीकडे शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधून ही कलाकार मंडळी वेळात वेळ काढून केळवणाचा आनंद घेत आहेत. अशातच येत्या १८ नोव्हेंबरला सिनेसृष्टीतील नावाजलेली जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. ही जोडी म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे. अमृता- प्रसाद ही जोडी लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. लवकरच ही मराठमोळी जोडी लग्नबंधनात अडकणार असून त्यांची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळतेय. (Amruta Prasad Kelvan)
लग्नसोहळा जवळ येत असला तरी अद्याप अमृता प्रसाद यांचं केळवण सुरूच आहे. याआधी ही रंग माझा वेगळा मालिकेच्या टीमने त्यांचं केळवण केलं होत. तसेच अमृताच्या आजोबांनी ही त्यांचं केळवण केलं होत. काही दिवसांपूर्वीच अमृताच्या भावाने म्हणजेच अभिषेक देशमुखने ही प्रसाद अमृताचं केळवण केलं. मॉडर्न अंदाजात त्यांनी हे केळवण केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा मराठमोळ्या जोडीचं केळवण झाल्याचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे.
अमृताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यांत अमृताने म्हटलं आहे की, “शेवटचं केळवण जवादेंच्या घरी” असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रसादचे कुटुंबीय दोघांचं औक्षण करताना, नजर काढताना दिसत आहेत. शिवाय त्यांना पंचपक्वान्न देत त्यांचं केळवण पार पाडलं. अमृताच्या या केळवणाच्या व्हिडिओवर अनेकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
‘बिग बॉस’मध्ये या दोघांमध्ये मैत्री झाली आणि ‘बिग बॉस’ नंतरही त्यांच्यातील मैत्रीचं हे नातं कायम राहिलं. काही काळानंतर या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर घरच्या घरीच त्यांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता दोघांची लगीनघाई सुरु झाली आहे. सध्या या दोघांच्या केळवणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे