नाटक, मालिका व चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी भावे हिने दमदार अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन सृष्टीत सक्रिय असलेली अभिनेत्री ‘स्वामिनी’, ‘भाग्य दिले तु मला’, ‘३६ गुणी जोडी’ सारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांना आपलंसं केलं. तसेच ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकातून ती रंगभूमीवर दिसते. इतकेच नव्हे, तर ‘पावनखिंड’ व ‘चंद्रमुखी’ या मराठी चित्रपटासह अनेक हिंदी कलाकृतींमधून तिने अभिनय कौशल्याची झलक दाखवली. सुरभी सध्या नाटकाबरोबरच ‘राणी मी होणार’ मालिकेत काम करत असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे. त्याचबरोबर ती तिच्या युट्युब चॅनेलमधून विविध व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. (Surabhi Bhave talks about her second miscarriage during play)
आपल्या बिनधास्त अंदाजासाठी व स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाणारी सुरभी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या “मज्जाचा अड्डा” या कार्यक्रमात आली. यावेळी तिने तिच्या कामाव्यतिरिक्त खासगी आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. दरम्यान, सुरभीने या मुलाखतीत दोन वेळा मिसकॅरेज झाल्याचा खुलासा करताना ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडलेला ‘तो’ अनुभव सांगितला.
हे देखील वाचा – मुलीला १०३ ताप असूनही मालिकेच्या शूटसाठी थांबवून ठेवलं अन्…; मराठी अभिनेत्री सुरभी भावेचा धक्कादायक खुलाासा, म्हणाली, “कोणाची गुलाम…”
या नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडलेल्या ‘त्या’ मिसकॅरेजबद्दल बोलताना म्हणाली, “साधारण जुलैची गोष्ट आहे. मी तेव्हा ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकांचे प्रयोग करत होते. तर त्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान मला अचानक अस्वस्थ व्हायला लागले. त्यानंतर मला भर मंचावर रक्तस्रावाचा त्रास सुरु झाला. मात्र, मला मंचाबाहेर पडण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा मी म्हटलं की, देवा लाज राख. काही वेळानंतर मी आतमध्ये आले. तेव्हा मला कळेच ना की काय करू. कारण काही मिनिटांनीच माझी त्या मंचावर एंट्री होणार होती. मग परत मंचावर एंट्री घेतली आणि त्याच्यानंतर मी माझ्या सह-कलाकारांना ही बाब सांगितली. नेमका हा प्रयोग पुण्याजवळ होता. त्यामुळे त्या प्रयोगानंतर मी लगेच जवळच्या डॉक्टरांकडे गेले. माझ्या डॉक्टरांना याबाबत विचारलं, तेव्हा तिने टेस्ट वगैरे करण्याचं सल्ला दिला. ती टेस्ट केल्यानंतर मी ‘३६ गुणी जोडी’च्या शूटला गेले. तिथे मी ब्रेकनंतर पुन्हा डॉक्टरांकडे गेले आणि तिथेच मला पुन्हा गरोदर असल्याचं कळलं.”
हे देखील वाचा – “पंखा साफ करायची वेळ…”, नेटकऱ्याच्या कमेंटवर सिद्धार्थ चांदेकरने दिलं तोडीस तोड उत्तर, म्हणाला, “कधी…”
पुढे गरोदर असल्याची बातमी कळल्यानंतर तिच्यासमोर अनेक गोष्टी दिसू लागल्या. “जेव्हा मला ही बातमी कळली, त्यावेळेस सान्वी, ते चार इंजेक्शन या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या. पण तेव्हा मी ठरवलं होतं की, मला आता हे मूल नको. तर त्याच्यानंतर मी व माझ्या नवऱ्याने यावर चर्चा केली. पण आम्ही काही म्हणायच्या आत पुन्हा ‘ते’ मिसकॅरेज झालं. त्यातही असं झालं की, ते गर्भ ७० टक्के पोटात राहिलं आणि ३० टक्के रक्तस्त्राव झालं. पुण्यातील ‘त्या’ प्रयोगानंतर मी परत तीन तासांचा ब्रेक घेतला, कारण त्यानंतर नागपूरचा दौरा होता. तेवढ्या वेळेत मी पुन्हा डॉक्टरकडे गेले आणि ते गर्भ काढून टाकलं, आणि मी पुढच्या प्रवासाला निघाले. त्यावेळेला मला कळलं की, ‘भावे तू खरंच उत्कट भावनेची आहेस.’ हे जेव्हा घडलं, तेव्हा माझ्या सहकलाकारांची मोठी साथ मिळाली आणि त्यांनी मला धीर दिला.”, असं सुरभी यावेळी म्हणाली.