शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नागराज मंजुळेंच्या चित्रपटात संभाजीराजे छत्रपती साकारणार भूमिका, स्वतःच खुलासा करत म्हणाले, “फोन आला अन्…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 8, 2024 | 5:27 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sambhajiraje Chhatrapati

नागराज मंजुळेंच्या चित्रपटात संभाजीराजे छत्रपती साकारणार भूमिका, स्वतःच खुलासा करत म्हणाले, "फोन आला अन्…"

कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संभाजीराजे छत्रपती यांना ओळखलं जातं. वर्षानुवर्षे चालत आलेलं वंशज सांभाळत व राजकीय घडामोडी करत त्यांनी कायमच प्रेक्षकांमध्ये आपली छाप पाडली. मराठा आरक्षण व गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या लढ्यात ते अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. आपले विचार, आपली भूमिका न घाबरता स्पष्टपणे मांडण्यात ते कधीही मागे हटले नाहीत. शिवाय आजवर त्यांनी त्यांच्या कामात कोणतीही हयगयही केली नाही. (Sambhajiraje Chhatrapati)

जनतेशी कायमच आपुलकीने वागणारे संभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर जाणारे कोल्हापूरचे पहिले खासदार म्हणून ओळखले गेले. राजकारणानंतर आता संभाजीराजे लवकरच एका वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. त्यांच्या एका नव्या इनिंगसाठी ते सज्ज झाले आहेत. ही इनिंग म्हणजे अभिनय. संभाजीराजे छत्रपती लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांना एका मराठी सिनेमात भूमिका करण्याची ऑफरही मिळाली असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या तीन वर्षांनंतर आई होणार यामी गौतम, लवकरच घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार, प्रेग्नंसी एण्जॉय करत आहे अभिनेत्री

नुकतीच संभाजीराजांनी ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी त्यांच्या या नव्या इनिंगविषयी भाष्य केलं. लोकप्रिय मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी संभाजीराजांना त्यांच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. नागराज हे सध्या त्यांच्या ‘खाशाबा’ या चित्रपटावर काम करत आहेत. नागराज मंजुळे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना ‘खाशाबा’ या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे.

आणखी वाचा – “‘मोरुची मावशी’ सारखं नाटक करुनही…”, वडिलांना एकही पुरस्कार नसल्याची लेक वरद चव्हाणला खंत, म्हणाला, “दुर्देवी गोष्ट आहे की….”

मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितलं की, “मला काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळेंचा फोन आला होता. ते लवकरच खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. खाशाबा जाधव यांना त्यावेळी आमचे आजोबा शहाजी महाराजांनी आर्थिक मदत केली होती. त्यामुळे शहाजी महाराजांची भूमिका तुम्ही करु शकता का? असं त्यांनी मला विचारलं. माझी चेहरेपट्टी, आवाज, माझं नाक यात त्यांना बरंच साम्य जाणवलं. त्यामुळे ही भूमिका मी करावी असा त्यांचा आग्रह होता. त्यानुसार मी आमचे आजोबा शहाजी महाराजांची भूमिका स्वीकारली आहे” असं ते म्हणाले.

Tags: entertainmentkhasahaba movienagraj manjulenagraj manjule movieSambhajiraje Chhatrapati
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Article 370 Official Trailer

"काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि राहील…", यामी गौतमच्या 'आर्टिकल ३७०'च्या ट्रेलरने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.