अभिनेत्री यामी गौतम ही बॉलिवूडमधील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभियनाबरोबरच यामीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. यामी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत यामी चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच यामीबद्दल एक आनंदाची बातमी समजत आहे. यामी व आदित्य धर यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
यामी प्रेग्नंट असून येत्या काही महिन्यात ती आई होणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, यामी साडेपाच महिन्यांची प्रेग्नंट आहे. यामी आणि आदित्यने आतापर्यंत याबाबत त्यांनी अद्याप कोणालाही सांगितले नाही. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, ती येत्या मे महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याचे म्हटले जात आहे. यामीच्या या प्रेग्नंसीच्या बातमीने तिच्या चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
नुकतीच यामीला ती आदित्य धरबरोबर एका सार्वजनिक ठिकाणी स्पॉट करण्यात आले होते. यावेळी ती ओढणीने तिचे पोट लपवताना दिसली. त्यानंतर सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसीच्या अनेक चर्चा झाल्या. अर्थात यामीने याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. पण ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार ती प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे.
यामी गौतम आणि आदित्य धर यांचा विवाह ४ जून २०२१ रोजी झाला होता. दोघांनी २ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही उरी: सर्जिकल स्ट्राइकच्या सेटवर भेटले आणि तिथेच एकमेकांच्या प्रेमात पडले. आता लग्नाच्या ३ वर्षानंतर हे जोडपे आई-वडील होणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.
दरम्यान, ‘आर्टिकल ३७०’ मध्ये यामी मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाची निर्मिती आदित्यने केली आहे. येत्या २३ फेब्रुवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे यामीच्या या आगामी चित्रपटासाठी व तिच्या बाळासाठी चाहतेमंडळी कमालीचे उत्सुक आहेत.