शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“स्विगी तुमच्या डिलिव्हरी बॉयला मी मारलंच कारण…”, स्विगी डिलिव्हरी बॉयवर भडकला रोनित रॉय, इलेक्ट्रिक वाहनावरुन वाद, म्हणाला, “जीवाची पर्वा…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 26, 2024 | 3:27 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ronit roy gets angry on swiggy delivery person for riding wrong side of road onto oncoming traffic

"स्विगी तुमच्या डिलिव्हरी बॉयला मी मारलंच कारण...", स्विगी डिलिव्हरी बॉयवर भडकला रोनित रॉय, इलेक्ट्रिक वाहनावरुन वाद, म्हणाला, "जीवाची पर्वा..."

आपल्या गंभीर तसेच सशक्त भूमिकांनी हिंदी टेलिव्हिजनचा पडदा गाजवणारा अभिनेता म्हणजे रोनित रॉय. आपल्या अनोख्या व हटके भूमिकांनी रोनितने कायमच  प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. डिसेंबरमध्ये रोनितने त्याच्या लग्नाच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या पत्नीबरोबर पुन्हा एकदा लग्न केले होते. यामुळे अभिनेता चांगलाच चर्चेत आला होता. अशातच आता त्याने केलेल्या एका कृतीमुळे रोनित रॉय पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे.

नुकतंच रोनित रॉयबरोबर एक प्रसंग घडला. एका स्विगी डिलिव्हरी बॉयने त्याचा जीव जाता जाता वाचवला असून याबद्दल एक एक्स पोस्ट शेअर करत रोनितने त्या डिलिव्हरी बॉयबद्दल संताप व्यक्त केला आहे आणि या पोस्टमध्ये अभिनेत्याने ‘स्विगी’ला टॅग देखील केले आहे. तसेच या पोस्टद्वारे त्याने आपली नाराजीदेखील व्यक्त केली आहे.

@Swiggy I almost killed one of your riders. They definitely need instructions on riding.Riding those small electric mopeds doesn’t mean that they ride on the wrong side of the road onto oncoming traffic. But then, Do you even care for their lives or is it just business as usual?

— Ronit Bose Roy (@RonitBoseRoy) February 25, 2024

आणखी वाचा – ‘कॅप्टन मार्वेल्स’ फेम केनेथ मिशेल यांचे निधन, वयाच्या ४९व्या वर्षी ‘या’ गंभीर आजाराने मृत्यूला गाठलं अन्…

अभिनेत्याने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत असे लिहिले आहे की, “स्विगी मी तुमच्या एका डिलिव्हरी बॉयला जवळजवळ मारलेच आहे. इलेक्ट्रिक वाहन चालवणे याचा अर्थ ट्रॅफिकमध्ये चुकीच्या दिशेने गाडी चालवणे असा होत नाही. तुम्हाला त्यांच्या जीवाची पर्वा आहे की नाही?. की हा व्यवसाय आहे आणि त्यामुळे हे सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे?”

आणखी वाचा – Video : असाही लग्नसोहळा! नवऱ्याने वरमाला घालताच भर मंडपात रडू लागली तितीक्षा तावडे, उपस्थितही बघत बसले अन्…

रोनितने शेअर केलेल्या या पोस्टला स्विगीनेही उत्तर देत असं म्हटलं आहे की, “प्रिय रोनित, आम्ही आमच्या डिलिव्हरी पार्टनरने सर्व ट्रॅफिक नियमांचे पालन करण्याची अपेक्षा करतो. तुम्ही व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेकडे आम्ही जातीने लक्ष देऊ. दरम्यान, तुमच्याकडे या प्रसंगाचा काही तपशील असल्यास कृपया शेअर करावा. जेणेकरून आम्ही आवश्यक ती कारवाई करू शकू”.

Tags: Bollywood entertainment newsbollywood newsentertainment newshindi actorRonit RoySwiggy Delivery Boyबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीरोनित रॉयस्विगी डिलिव्हरी बॉयहिंदी अभिनेता
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
mitali mayekar

नववधूसारखी तयार झाली मिताली मयेकर, मंगळसूत्राची डिझाइन आहे फारच युनिक, काळ्या मण्यांमध्ये कमी प्रमाणात सोन्याचा वापर अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.