सध्या सर्वत्र लग्नसराई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान अनेक कलाकार जोड्याही लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहेत. या कलाकारांच्या खास लूकचीही सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. चाहत्यांना, प्रेक्षकांनाही या कलाकार मंडळींच्या खास लूकची भुरळ पडलेली असते. या कलाकार मंडळींचे लग्नसोहळ्यातील खास कपडे, दागिने यांमध्ये केल्या जाणाऱ्या फॅशनही चाहतेमंडळी लगेच आत्मसात करतात. अशातच लग्नसराईच्या या दिवसांत पुन्हा एकदा एका हटके स्टाईलच्या मंगळसूत्राची चर्चा सुरु झाली आहे. (Mitali Mayekar Mangalsutra Design)
नववधूच्या गळ्यातील मंगळसूत्राच्या डिझाइनने ही चर्चा रंगली आहे. आणि या चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळत असतानाच एका मराठमोळ्या अभिनेत्रींच्या गळ्यातील मंगळसूत्राने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. मिताली मयेकर व सिद्धार्थ चांदेकर यांचा शाही विवाहसोहळा झाला असून यावर्षी दोघांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. सिद्धार्थ व मिताली ही जोडी प्रेक्षकांच्या लाडक्या जोडीपैकी एक आहे.
नुकताच मितालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या मराठमोळ्या लूकमधील एक फोटो शेअर केला आहे. मिताली व सिद्धार्थ दोघांनी पारंपरिक अंदाजात एका कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पेलवली होती. यावेळी मितालीने पिवळ्या रंगाची काठपदरची साडी नेसली होती. त्यावर तिने पारंपरिक असा साज केलेला पाहायला मिळाला. मितालीच्या या फोटोमधील आकर्षणाची बाब म्हणजे तिचं मंगळसूत्र. मितालीने काळे व सोन्याचे मणी असलेलं खास मोठं मंगळसूत्र परिधान केलं होतं. या खास मंगळसूत्रामुळे तिच्या लूकमध्ये आणखीनच भर पडलेली पाहायला मिळाली. शिवाय हातातील चुडा आणि नाकातील नथही लक्षणीय ठरत आहे.
मिताली व सिद्धार्थ यांच्या मैत्रीपासून सुरु झालेल्या नात्याचं प्रेमात रूपांतर झालं, आणि त्यानंतर दोघांनी लगीनगाठ बांधली. सिद्धार्थ व मिताली यांचा सध्या सुखाचा संसार सुरु असलेला पाहायला मिळत आहे. दोघेही त्यांच्या सोशल मीडियावरुन एकमेकांबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करताना दिसतात. दोघांचाही सहजीवनाचा प्रवास सुरळीत सुरु आहे.