बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : असाही लग्नसोहळा! नवऱ्याने वरमाला घालताच भर मंडपात रडू लागली तितीक्षा तावडे, उपस्थितही बघत बसले अन्…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 26, 2024 | 2:27 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Titeeksha tawde cry after she tie knot with sidharth bodke video viral on social media

Video : असाही लग्नसोहळा! नवऱ्याने वरमाला घालताच भर मंडपात रडू लागली तितीक्षा तावडे, उपस्थितही बघत बसले अन्...

Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : गेले काही दिवस छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके हे दोघे चांगलेच चर्चेत आहेत. ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत या दोघांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. तेव्हापासून त्यांच्या चाहत्यांना दोघांचे लग्नाचे वेध लागले होते. अशातच ही जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. सिद्धार्थच्या एका मित्राने लग्न लागताच दोघांबरोबरचा एकत्र एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तितीक्षा व सिद्धार्थ दोघेही नववधूवराच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.

लग्नासाठी तितीक्षा व सिद्धार्थने खास लूक केला असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तितीक्षाने ऑफ व्हाईट रंगाची नऊवारी साडी नेसली होती तर या साडीला साजेसा असा पिवळ्या रंगाचा डिझाइनर ब्लाऊजही परिधान केला आहे. तर सिद्धार्थने तितीक्षाच्या लूकला साजेसा असा ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी व त्यावर धोतर परिधान केला होता. त्यांचा हा खास लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – शुभमंगल सावधान! निसर्गाच्या सानिध्यात थाटामाटात पार पडलं तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचं लग्न, युनिक ड्रेसिंग स्टाइलने जपली मराठी परंपरा

तितीक्षा व सिद्धार्थने एकमेकांना वरमाला परिधान करताच तितीक्षाला अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. सिद्धार्थने तितीक्षाच्या गळ्यात वरमाला घालताच तितीक्षाला रडू आले. तितीक्षा आपल्या लाडक्या जोडीदाराबरोबर विवाहबंधनात अडकताच तिला अश्रु जमा झाले. अर्थातच तितीक्षाच्या डोळ्यात आलेले हे अश्रु आनंदाचे आहेत.

आणखी वाचा – ‘कॅप्टन मार्वेल्स’ फेम केनेथ मिशेल यांचे निधन, वयाच्या ४९व्या वर्षी ‘या’ गंभीर आजाराने मृत्यूला गाठलं अन्…

दरम्यान, निसर्गाच्या सानिध्यात तितीक्षा व सिद्धार्थने एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली आहे. तितीक्षा व सिद्धार्थ गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मैत्रीपासून सुरु झालेल्या त्यांच्या नात्याचं प्रेमात रूपांतर झालं आणि अखेर आज दोघांनी एकममेकांबरोबर लगीनगाठ बांधली आहे. दोघांनीही सहजीवनाच्या प्रवासाचं एक पाऊल टाकलं आहे.  

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Prem Sagar on Ramayana serial

नवी ‘रामायण’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, प्रेम सागर यांची मोठी घोषणा, म्हणाले, “रामाच्या शोधात आहोत कारण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.