आपल्या गंभीर तसेच सशक्त भूमिकांनी हिंदी टेलिव्हिजनचा पडदा गाजवणारा अभिनेता म्हणजे रोनित रॉय. आपल्या अनोख्या व हटके भूमिकांनी रोनितने कायमच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. डिसेंबरमध्ये रोनितने त्याच्या लग्नाच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या पत्नीबरोबर पुन्हा एकदा लग्न केले होते. यामुळे अभिनेता चांगलाच चर्चेत आला होता. अशातच आता त्याने केलेल्या एका कृतीमुळे रोनित रॉय पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे.
नुकतंच रोनित रॉयबरोबर एक प्रसंग घडला. एका स्विगी डिलिव्हरी बॉयने त्याचा जीव जाता जाता वाचवला असून याबद्दल एक एक्स पोस्ट शेअर करत रोनितने त्या डिलिव्हरी बॉयबद्दल संताप व्यक्त केला आहे आणि या पोस्टमध्ये अभिनेत्याने ‘स्विगी’ला टॅग देखील केले आहे. तसेच या पोस्टद्वारे त्याने आपली नाराजीदेखील व्यक्त केली आहे.
@Swiggy I almost killed one of your riders. They definitely need instructions on riding.Riding those small electric mopeds doesn’t mean that they ride on the wrong side of the road onto oncoming traffic. But then, Do you even care for their lives or is it just business as usual?
— Ronit Bose Roy (@RonitBoseRoy) February 25, 2024
आणखी वाचा – ‘कॅप्टन मार्वेल्स’ फेम केनेथ मिशेल यांचे निधन, वयाच्या ४९व्या वर्षी ‘या’ गंभीर आजाराने मृत्यूला गाठलं अन्…
अभिनेत्याने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत असे लिहिले आहे की, “स्विगी मी तुमच्या एका डिलिव्हरी बॉयला जवळजवळ मारलेच आहे. इलेक्ट्रिक वाहन चालवणे याचा अर्थ ट्रॅफिकमध्ये चुकीच्या दिशेने गाडी चालवणे असा होत नाही. तुम्हाला त्यांच्या जीवाची पर्वा आहे की नाही?. की हा व्यवसाय आहे आणि त्यामुळे हे सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे?”
आणखी वाचा – Video : असाही लग्नसोहळा! नवऱ्याने वरमाला घालताच भर मंडपात रडू लागली तितीक्षा तावडे, उपस्थितही बघत बसले अन्…
रोनितने शेअर केलेल्या या पोस्टला स्विगीनेही उत्तर देत असं म्हटलं आहे की, “प्रिय रोनित, आम्ही आमच्या डिलिव्हरी पार्टनरने सर्व ट्रॅफिक नियमांचे पालन करण्याची अपेक्षा करतो. तुम्ही व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेकडे आम्ही जातीने लक्ष देऊ. दरम्यान, तुमच्याकडे या प्रसंगाचा काही तपशील असल्यास कृपया शेअर करावा. जेणेकरून आम्ही आवश्यक ती कारवाई करू शकू”.