गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रितेश देशमुखला मोठा धक्का, जवळच्या व्यक्तीचं निधन, म्हणाला, “माझा मोठा भाऊ, मार्गदर्शक…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 16, 2025 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Riteish Deshmukh Manager Death

रितेश देशमुखला मोठा धक्का, जवळच्या व्यक्तीचं निधन, म्हणाला, “माझा मोठा भाऊ, मार्गदर्शक...”

रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. कलाक्षेत्रात कार्यरत असताना इतर कामांचा सगळा भार त्याचे मॅनेजर उत्तम पद्धतीने सांभळतात. मात्र रितेशसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. त्यामुळे तो पूर्णपणे कोलमडून गेला आहे. रितशचे मॅनेजर राजकुमार तिवारी यांचं निधन झालं आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे राजकुमार यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत माहिती दिली. राजकुमार यांच्या निधनाची बातमी कळताच रितेशला मोठा धक्का बसला. कित्येक वर्ष त्यांनी रितेशची उत्तम पद्धतीने साथ दिली होती. मात्र राजकुमार यांच्या अचानक जाण्याने रितेशसाठी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (Riteish Deshmukh Manager Death)

रितेशने स्टोरीद्वारे राजकुमार यांच्याबद्दल सांगितलं. त्यांनी अगदी कठीण प्रसंगांमध्येही रितेशची साथ सोडली नाही. बरीच वर्ष आपलं काम अगदी प्रामाणिकपणे केलं. राजकुमार यांचा हाच गुण रितेशला आवडला. रितेशचाही राजकुमार यांच्यावर प्रचंड विश्वास होता. राजकुमार यांच्याबरोबरचा जुना फोटो शेअर करताच दोघांमधील नातं किती घट्ट होतं हे दिसून येत.

आणखी वाचा – आई झाल्यानंतर किनारा अडवाणीची पहिली पोस्ट, आनंद गगनात मावेना, कलाकारांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव

रितेशने फोटो शेअर करत म्हटलं की, “राजकुमार तिवारी यांचं निधन झालं हे ऐकूनच मला खूप दुःख झालं आहे. ते माझे कुटुंब, मोठे भाऊ आणि मार्गदर्शक होते. मी जिथपासून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं तिथपासून ते माझं सगळं काम पाहत होते. कठीण काळातही माझ्या पाठिशी अगदी खंबीरपणे उभे राहिले. तिवारी सर मला तुमची नेहमीच आठवण येत राहिल”.

आणखी वाचा – ‘पंचायत’ फेम अभिनेत्याला वयाच्या ३५व्या वर्षी हृदयविकाराचा झटका, स्वतःच दिली माहिती, म्हणाला, “गेले ३६ तास…”

राजकुमार यांच्या पाठी त्यांची दोन मुलं आहे. सिद्धार्थ व सुजित अशी त्यांची नावं आहेत. रितेशने या दोन मुलांचंही सांत्वन केलं. तसेच रितेश म्हणाला, “तिवारी यांच्या संपूर्ण कुटुंबियांबाबत मी शोक व्यक्त करतो. त्यांची मुलं सिद्धार्थ व सुजित यांना ताकद मिळो”. तिवारी यांच्या जाण्यामुळे रितेश दुखावला गेला आहे. अगदी त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच राजकुमार यांनी त्याला उत्तम साथ दिली. त्यांचं जाणं रितेशसाठी धक्कादायकच ठरलं आहे.

Tags: bollywood newsentertainment newsriteish deshmukh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Kabir Bedi failed open marriage

लग्न टिकून राहावं म्हणून दुसऱ्याच व्यक्तीशी संबंध, चार लग्न अन्...; कबीर बेदींचं आयुष्य पुन्हा चर्चेत, ओपन मॅरेजचा निर्णय घेऊन...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.