रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्न टिकून राहावं म्हणून दुसऱ्याच व्यक्तीशी संबंध, चार लग्न अन्…; कबीर बेदींचं आयुष्य पुन्हा चर्चेत, ओपन मॅरेजचा निर्णय घेऊन…

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 16, 2025 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kabir Bedi failed open marriage

लग्न टिकून राहावं म्हणून दुसऱ्याच व्यक्तीशी संबंध, चार लग्न अन्...; कबीर बेदींचं आयुष्य पुन्हा चर्चेत, ओपन मॅरेजचा निर्णय घेऊन...

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता कबीर बेदी यांनी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आता त्यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली आहे. मात्र कामाबरोबरच कबीर त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले. कबीर यांनी तीन ते चार लग्न केलं. पहिल्या लग्नाबाबत त्यांनी आता भाष्य केलं आहे. प्रोतिमा यांच्याबरोबर त्यांनी पहिलं लग्न केलं. सात वर्ष संसार केल्यानंतर दोघांच्या नात्यामध्ये फूट पडली. विशेष म्हणजे विवाहबाह्य संबंधांमुळे दोघांच्या नात्यामध्ये वादाची ठिणगी पडली. त्यानंतर ओपन मॅरेजचा पर्याय निवडण्याचं त्यांनी ठरवलं. मात्र तेही काही कबीर व प्रोतिमा यांच्याकडून शक्य झालं नाही. याचबाबत त्यांनी आता भाष्य केलं आहे. (Kabir Bedi failed open marriage)

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत कबीर यांनी म्हटलं की, “प्रोतिमा आणि माझं लग्न झालं. मुलंही झाली. सात वर्ष आम्ही एकत्र होतो. पण त्यानंतर विवाहबाह्य संबंधांमुळे अडचण होण्यास सुरुवात झाली. ओपन मॅरेज हा आमच्यासाठी एक पर्याय होता. त्याद्वारे आम्ही मुलांचाही सांभाळ करु शकत होतो. मात्र तेही आमच्याकडून झालं नाही. शेवटी आम्हाला वेगळंच व्हावं लागलं”.

आणखी वाचा – रितेश देशमुखला मोठा धक्का, जवळच्या व्यक्तीचं निधन, म्हणाला, “माझा मोठा भाऊ, मार्गदर्शक…”

View this post on Instagram

A post shared by Kabir Bedi (@ikabirbedi)

पुढे ते म्हणाले, “ओपन मॅरेजमध्ये आम्ही दोघंही वेगळी नाती शोधायला लागलो. वेगवेगळ्या लोकांशी भेटायचो, बोलायचो. खरं तर हे काही सोप नव्हतं. प्रोतिमाच्या दुसऱ्या रोमँटिक नात्याबाबत कळालं तेव्हा खूपच अवघड होऊन बसलं. माझ्यासाठी तिचं हे नातं त्रासदायक ठरत होतं. प्रोतिमाचं नातं आहे तर त्यापासून काहीच त्रास होणार नाही असं मला सुरुवातील वाटलं. पण मला ते पाहून त्रास झालाच”.

आणखी वाचा – ‘पंचायत’ फेम अभिनेत्याला वयाच्या ३५व्या वर्षी हृदयविकाराचा झटका, स्वतःच दिली माहिती, म्हणाला, “गेले ३६ तास…”

“ओपर मॅरेजमध्ये आम्ही राहू शकतो असं वाटत होतं. पण असं काहीच घडलं नाही. १९७४मध्ये आम्ही वेगळे झालो. त्यानंतर प्रोतिमा अध्यात्मिक मार्गाकडे वळली. तिने सन्यासी बनण्याचा निर्णय घेतला”. कबीर यांनी यानंतर मात्र तीन लग्न केले. प्रत्येक नात्यामध्ये वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता वयाची ७०री ओलांडल्यानंतर ते चौथी पत्नी परवीन दोसांज यांच्याबरोबर राहत आहेत.

Tags: bollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
ankita lokhande beauty secrets

अंकिता लोखंडेच्या चमकदार त्वचेचं रहस्य आहे तरी काय?, चांदीचा ग्लास, मॅजिक वॉटर आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.