गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पंचायत’ फेम अभिनेत्याला वयाच्या ३५व्या वर्षी हृदयविकाराचा झटका, स्वतःच दिली माहिती, म्हणाला, “गेले ३६ तास…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 16, 2025 | 11:03 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
panchayat actor heart attack

'पंचायत' फेम अभिनेत्याला वयाच्या ३५व्या वर्षी हृदयविकाराचा झटका, स्वतःच दिली माहिती, म्हणाला, "गेले ३६ तास..."

panchayat actor heart attack : ‘पंचायत’ फेम आसिफ खानबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला होता, ज्याबद्दल त्याने स्वतःच सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी आसिफला हार्ट अटॅक आला. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. इतक्या कमी वयात हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक दिवशी कोणा ना कोणा व्यक्तीबाबत हार्ट अटॅकचे कानावर येते. अशातच आता प्रसिद्ध अभिनेत्यालाही कमी वयात हार्ट अटॅकच्या समस्येचा लढा द्यावा लागत आहे.

आसिफ खानने एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “गेल्या ३६ तासांत मला समजले की आयुष्यात काहीही घडू शकते. आयुष्य अजिबात हलके घेतले जाऊ नये. आयुष्याबद्दल नेहमीच आभारी रहा”. त्याने पुढे लिहिले, “आयुष्यात तुमच्यासाठी कोण महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा आणि नेहमी त्यांना आपल्याबरोबर ठेवा. आयुष्य ही एक भेट आहे आणि नेहमीच त्याची कदर आहे”.

आणखी वाचा – मुलगी झाली हो! कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी चिमुकलीचे आगमन, लग्नाच्या दोन वर्षांनी झाले आई-बाबा

या व्यतिरिक्त, आसिफने आणखी एक कथा शेअर करत त्याच्या आरोग्याबद्दल माहिती दिली आहे. आणखी एक टीप शेअर करत त्याने लिहिले आहे की, “मी काही तासांपासून आरोग्याच्या समस्यांसह संघर्ष करीत आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर आता मी बरा होत आहे आणि मला बरे वाटत आहे”.
आसिफने पुढे लिहिले, “मी तुमच्या सर्वांचे प्रेम, चिंता आणि शुभेच्छा यांचे कौतुक करतो. आपले समर्थन माझ्यासाठी सर्वकाही आहे. मी लवकरच परत येईन. तोपर्यंत मला आठवणीत ठेवल्याबद्दल धन्यवाद”.

आणखी वाचा – “हिंमत असेल तर…”, मराठी अभिनेत्रीचा थेट प्रशासनाला सवाल, म्हणाली, “गरिबांचा स्टॉल बंद पाडू नका”

‘पंचायत’ मालिकेतून प्रसिद्धी मिळविणार्‍या आसिफने बर्‍याच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. यामध्ये यावर्षी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘परी’, ‘पगलैट’, ‘द ग्रेट इंडियन फैमिली’, ‘काकूदा’ आणि ‘द भूतनी’ यांचा समावेश आहे. ‘पंचायत’ व्यतिरिक्त तो बर्‍याच वेब मालिकेतही दिसला आहे. यामध्ये ‘मिर्झापूर’ ‘जामतारा’, ‘पाताल लोक’ आणि ‘देहाती लड़के’ सारख्या शोचा समावेश आहे.

Tags: actor heart attackbollywood newsPanchayat
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
siddharth malhotra kiara advani baby girl

आई झाल्यानंतर कियारा अडवाणीची पहिली पोस्ट, आनंद गगनात मावेना, कलाकारांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.