सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आई झाल्यानंतर कियारा अडवाणीची पहिली पोस्ट, आनंद गगनात मावेना, कलाकारांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 16, 2025 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
siddharth malhotra kiara advani baby girl

आई झाल्यानंतर किनारा अडवाणीची पहिली पोस्ट, आनंद गगनात मावेना, कलाकारांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव

siddharth malhotra kiara advani baby girl : बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अ‍डवानी आता आई-बाबा झाले आहेत. पालक झाल्याची आनंदाची बातमी त्यांनी देताच चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळी, कुटुंबीय यांनाही आनंद झाला आहे. कियारा व सिद्धार्थ छोट्या राजकुमारीचे पालक बनले आहेत. १५ जुलैच्या रात्री कियाराने चिमुकल्या मुलीला जन्म दिला. आता बुधवारी, १६ जुलै रोजी सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनीही सोशल मीडियावर घोषणा केली आहे. दोघांच्या या पोस्टवर चाहतेमंडळी भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अ‍डवानी यांनी इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाची सुंदर अशी पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिले आहे की, “आपले हृदय आनंदाने भरुन आले आहे आणि आमचे जग आता कायमचे बदलले आहे. आम्ही बाळ मुलीचे स्वागत करुन आशीर्वादित आहोत. कियारा आणि सिद्धार्थ”. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने हार्ट ईमोजी जोडला आहे. कियाराच्या या पोस्टवरुन आई झाल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा – मुलगी झाली हो! कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी चिमुकलीचे आगमन, लग्नाच्या दोन वर्षांनी झाले आई-बाबा

View this post on Instagram

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

या पोस्टवर अभिनंदन करणार्‍यांनी गर्दी केली आहे. कियारा आई आणि सिद्धार्थ वडील झाल्यानंतर अदा खान हिने अभिनंदन केले. सुनील ग्रोव्हरने लिहिले आहे, “बेस्ट !!!! मम्मी-डॅडीचे अभिनंदन”. भारती सिंग हिनेदेखील कमेंट करत, “अभिनंदन”, असं म्हटलं आहे. आलिया भट्टची बहीण शाहीनने लिहिले आहे की, “होय”. मनीष मल्होत्रा ते फलक नाझ, अथिया शेट्टी, हुमा कुरेशी, संजय कपूर, नेहा धुपिया यांनीही कमेंट करत या दोघांचे अभिनंदन केले. चाहत्यांनाही कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – ‘पंचायत’ फेम अभिनेत्याला वयाच्या ३५व्या वर्षी हृदयविकाराचा झटका, स्वतःच दिली माहिती, म्हणाला, “गेले ३६ तास…”

सिद्धार्थ आणि कियारा यांनी ‘शेर शाह’ या चित्रपटात एकत्र काम केले. पडद्यावर रोमँटिक सीन करताना, दोघेही खऱ्या आयुष्यातही प्रेमात पडले. त्यांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी अगदी थाटामाटात लग्न केले. आणि आता अडीच वर्षांच्या लग्नानंतर त्यांचे घर चिमुकलीच्या आगमनाने आनंदित झाले आहे.

Tags: instagram postKiara Advanisiddharth malhotra
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Riteish Deshmukh Manager Death

रितेश देशमुखला मोठा धक्का, जवळच्या व्यक्तीचं निधन, म्हणाला, “माझा मोठा भाऊ, मार्गदर्शक...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.