शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखची मोठी घोषणा, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट करणार, व्हिडीओ समोर

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 19, 2024 | 9:47 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Riteish Deshmukh announced his upcoming directorial film raja shivaji poster released

शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखची मोठी घोषणा, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट करणार, व्हिडीओ समोर

आज १९ फेब्रुवारी. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र जल्लोषाचे व उत्साहाचे वातावरण आहे. शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच शिवजयंतीचे औचित्य साधत मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. अभिनेता म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर रितेशने दिग्दर्शक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शिवजयंती २०२४ च्या शुभमुहूर्तावर रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक भव्य चित्रपटाची घोषणा केली आहे आणि या चित्रपटाचे नाव ‘राजा शिवाजी’ असं आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. ‘जिओ स्टुडिओज’ व ‘मुंबई फिल्म कंपनी’ प्रस्तुत आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख यांनी केले आहे. तर ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत. तसेच या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचे संगीत लाभले आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेशने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याच्या भावना व्यक्त करत असे म्हटले आहे की, “इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तीनशे वर्षांपासून प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा तो आशेचा एक महासूर्य आहे.”

आणखी वाचा – कुणी तरी येणार येणार गं…; वरुण धवन लवकरच होणार बाबा, सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सीमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे ‘राजा शिवाजी’”

आणखी वाचा – पुरणपोळी, गुलाबजाम अन्…; तितीक्षा-सिद्धार्थ यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, ‘या’ खास व्यक्तीने पार पाडले केळवण

दरम्यान, रितेशने शेअर केलेल्या या पोस्टरला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच वर्षाव केला आहे. तर अनेकांनी या चित्रपटासाठी उत्सुकता दर्शवली आहे. त्याचबरोबर रितेशच्या या आगामी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

Tags: entertainment newsmarathi actormarathi directormarathi entertainmentmarathi entertainment newsmarathi movieMarathi newsRaja Shivajiriteish deshmukhshivjayantiमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी चित्रपटमराठी दिग्दर्शकमराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीराजा शिवाजीरितेश देशमुख
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Next Post
Wanted fame actress Ayesha takia lashed out at trolls for look and speak i have zero interest to doing any film

"माझी बहीण रुग्णालयात आणि…" लूकवरुन ट्रोल करणाऱ्यांवर भडकली आयशा टाकिया, म्हणाली, “देशातील महत्त्वाचे मुद्दे सोडून…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.